Hinjawadi : व्हाट्सअपवरील मित्राने घातला 94 लाखाचा गंडा

एमपीसी न्यूज – व्हाट्सअपवर झालेल्या मित्राने कंपनीत पैसे गुंतवून व्यवसाय करण्याचे अमिश दाखवून 94 लाखाचा गंडा घातला. ही घटना कांचनबाग सोसायटी, बावधन येथे घडली.
संग्राम सुहासराव रसाळ (वय 37, रा. कांचनबाग सोसायटी, बावधन खुर्द) यांनी याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार कृष्णचारण पांडुरंग देवभक्तुनी मरतुर प्रकासम (रा, विजयवाडा, आंध्रप्रदेश) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने फिर्यांदी यांच्याशी व्हाट्सअपवर मैत्री केली. त्यानंतर फिर्यादी यांना व्हॉटस अपवरून कंपनीत पैसा गुंतवला असता होणाऱ्या फायद्यातील 50 टक्के फायदा फिर्यादी यांना मिळेल असे आमिष दाखविले. त्यासाठी फिर्यादूकडून 2017 ते एप्रिल 2018 या वर्षभरात चेक, नेट बॅंकींग व आरटीजीएस द्वारे सुमारे 94 लाख 50 हजार रुपये घेतले मात्र त्यांचा 50 टक्के लाभ फिर्यादी यांना दिला नाही. यावरून आपली फसवणूक झाल्याने लक्षात येताच रसाळ यांनी थेट पोलीस ठाणे गाठले आणि तक्रार दिली. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.