BNR-HDR-TOP-Mobile

Chinchwad : महापालिकेच्या नागरवस्ती विभागातर्फे महिलांना शिलाई मशीनसाठी आर्थिक मदत

एमपीसी न्यूज-पिंपरी चिंचवड महापालिकेच्या नागरवस्ती विभागामार्फत अटलबिहारी वाजपेयी योजने अंतर्गत महिलांना शिलाई मशीनकरिता आर्थिक मदतीचे वाटप करण्यात आले. आर्थिक मदत वाटपाचा कार्यक्रम चिंचवड मधील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह येथे पार पडला.

कार्यक्रमासाठी महापौर राहुल जाधव, सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार, शहर सुधारणा समिती सभापती सिमा चौगुले, महिला व बालकल्याण समिती सभापती स्वीनल म्हेत्रे, जैव विविधता व्यवस्थापन समिती अध्यक्षा उषा मुंढे, “ब” प्रभाग अध्यक्षा करूणा चिंचवडे, “क” प्रभाग अध्यक्षा नम्रता लोंढे, नगरसदस्या आशा धायगुडे-शेंडगे, माधवी राजापुरे, उषा ढोरे, स्वाती काटे, अर्चना बारणे, आरती चौंधे, निर्मला कुटे, योगिता नागरगोजे, नगरसदस्य शितल शिंदे, स्वीकृत सदस्य बिभिषण चौधरी, अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील, सहाय्यक आयुक्त स्मिता झगडे, समाजविकास अधिकारी संभाजी ऐवले आदी उपस्थित होते.

महापौर राहुल जाधव म्हणाले, “पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या नागरवस्ती विभागामार्फत विविध योजना महिलांसाठी राबविण्यात असून त्याचा सर्व महिलांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा. भविष्यकाळात देखील पिंपरी चिंचवडकरांसाठी आम्ही कार्य तत्पर आहोत. ज्या ज्या योजना पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने राबविण्यात येत आहेत. त्या सर्व योजनांची पारदर्शकपणे अंमलबजाणी करण्यात येईल.”

पक्षनेते एकनाथ पवार म्हणाले, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या माध्यमातून महिलांसाठी शिलाई मशीनच्या माध्यमातून रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. आज प्लास्टिकच्या बॅगा बंद आहेत महिलांना कापडी पिशव्या शिवून व्यवसाय करण्याची चांगली संधी आहे. पुढच्या वर्षी जर शंभर महिला बचत गटांचा व्यवसाय सुरू झाला तर अधिक आनंद होईल.”

महिला व बालकल्याण समिती सभापती स्वीनल म्हेत्रे व नगरसदस्या आशा धायगुडे-शेंडगे आदींनी देखील मनोगत व्यक्त केले. तसेच पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने “बेटी बचाओ बेटी पढाओ” योजने अंतर्गत एका मुलींवर कुटूंब नियोजनद्वारे शस्त्रक्रीया करणा-या महिलांना 25 हजार रुपये व दोन मुलींवर कुटूंब नियोजनद्वारे शस्त्रक्रीया करणा-या महिलांना 10 हजार रूपये देण्यात येत असून त्याअंतर्गत बेचाळीस लाभार्थी महिलांचा सन्मानही कार्यक्रमात करण्यात आला.

अशोक देशमुख यांनी महिलांसाठी ताण तणावापासून मुक्ती हा मनोरंजनात्मक कार्यक्रम सादर केला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सहाय्यक आयुक्त स्मिता झगडे यांनी केले. सूत्रसंचालन भाऊसाहेब कोकाटे यांनी केले.

HB_POST_END_FTR-A2

HB_POST_END_FTR-A3