Pimpri : शहरातील पाणीपुरवठा दोन दिवस विस्कळीत

एमपीसी न्यूज – रावेत येथील पंपींग स्टेशनमधील आवश्यक कामे करण्यात येणार आहेत. त्यामुळे पिंपरी-चिंचवड शहरातील पाणीपुरवठा गुरुवार (दि. 13) आणि शुक्रवार (दि. 14) हे दोन दिवस एक वेळ पाणीपुरवठा होणार आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या रावेत येथील पंपींग स्टेशनमधील काही तातडीची आवश्यक कामे तसेच सेक्टर क्रमांक 23 मधील जलशुद्धीकरण केंद्रातील पाणीपुरवठा विभागाची व विद्युत विभागातील नियमित देखभाल दुरुस्तीची कामे करण्यात येणार आहेत. तसेच शहरातील पाणी वितरण व्यवस्थेतील दुरुस्तीची देखील कामे करण्यात येणार असल्याने गुरुवारी पाणीपुरवठा यंत्रणा बंद ठेवण्यात येणार आहे.

गुरुवारी दिवसभर पाणीपुरवठा यंत्रणा बंद असल्यामुळे गुरुवारी सकाळी पाणी येणार असून सायंकाळचा पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर शुक्रवारी सकाळी देखील पाणीपुरवठा बंद राहणार आहे. दोन दिवस एक वेळ पाणी पुरवठा अनियमित होणार असल्याने नागरिकांनी पाण्याचा जपून वापर करण्याचे आवाहन महापालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.