Kasarwadi : डांबराच्या ट्रकचे चाक पेटले; नाशिक फाट्यावर वाहतूक कोंडी

एमपीसी न्यूज – कासारवाडी कडून पुण्याच्या दिशेने डांबर घेऊन जाणा-या ट्रकचे चाक पेटले. यामुळे ट्रक भर रस्त्यात थांबला. रस्ता अरुंद झाल्याने वाहनांच्या लांबपर्यंत रांगा लागल्या. ही घटना आज (गुरुवारी) दुपारी पावणे एकच्या सुमारास कासारवाडी येथे जुना पुणे-मुंबई महामार्गावर घडली.

दुपारी पावणे एकच्या सुमारास एक ट्रक (एम एच 14 / ए एस 8700) कासारवाडी कडून पुण्याच्या दिशेने जुना पुणे मुंबई महामार्गावरून जात होता. ट्रक मध्ये मोट्या प्रमाणात लोड होता. टायर देखील खराब झाले होते. ट्रकच्या इंजिनमध्ये अचानक तांत्रिक बिघाड झाला. त्यामुळे ट्रकला आग लागली. यामध्ये ट्रकच्या टायरचे नुकसान झाले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवित हानी झाली नाही. खडकी कॅंटोन्मेंट बोर्डाचा एक आणि संत तुकाराम नगर अग्निशमन दलाचे दोन बंब घटनास्थळी तात्काळ दाखल झाले आणि आगीवर नियंत्रण मिळवले.

हा अपघात भर रस्त्यात झाल्याने ट्रक रस्त्याच्या मधोमध थांबला. यामुळे नाशिक फाट्यावर काही वेळ वाहनांच्या लांबपर्यंत रांगा लागल्या. स्थानिक नागरिक व अग्निशमन दलाच्या जवानांनी वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी प्रयत्न केले. अर्ध्या तासानंतर वाहतूक सुरळीत झाली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.