Chinchwad: राष्ट्रीय मतदार दिवस उत्साहात

एमपीसी न्यूज – चिंचवड विधानसभा मतदार संघाचे वतीने आणि इंदिरा कॉलेज ऑफ कॉमर्स व सायन्स, ताथवडे यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित नववा राष्ट्रीय मतदार दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. मतदार नोंदणी अधिकारी दिलीप गावडे यांनी सर्व उपस्थितांना शपथ देऊन मतदार नाव नोंदणी करण्याचे आवाहन केले.

इंदिरा कॉलेज ऑफ कॉमर्स व सायन्स, ताथवडे येथे झालेल्या कार्यक्रमाला साजरा करण्यात आला. 205 चिंचवड विधानसभा मतदार संघ मतदार नोंदणी अधिकारी दिलीप गावडे, सिने अभिनेत्री प्रियंका यादव, आंतरराष्ट्रीय तिरंदाजी खेळाडू सोनल बुंदेले, तहसीलदार तथा सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी राधिका हावळ, समन्वयक दीपक कन्हेरे, हरिभाऊ साबळे, वर्षा सपकाळ यावेळी उपस्थित होते.

मतदानाचा हक्क हा नुसता हक्क न समजता कर्तव्य समजून मतदान केले पाहिजे, असे प्रियंका यादव म्हणाल्या. मतदानाचा दिवस हा सुट्टी एन्जॉय करण्याचा नसून राष्ट्रीय कर्तव्य बजाविण्याचा दिवस समजून मतदानासाठी गेले पाहिजे, असे सोनल बुंदेले यांनी सांगितले. यावेळी उत्कृष्ट कामगिरी करणा-या बीएलओ व नोडल ऑफिसर यांचा सन्मान करण्यात आला. तसेच मतदार दिनानिमित घेण्यात आलेल्या विविध स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देण्यात आले.

थेरगाव येथे माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांची मतदार जागृती बाबत प्रभातफेरी काढण्यात आली. तसेच चिंचवड विधानसभा मतदार संघातील मतदान केंद्र असलेला 61 पदनिर्देशित ठिकाणी राष्ट्रीय मतदार दिवस साजरा करण्यात आला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.