Chakan : वाघजाईनगर येथून विवाहिता बेपत्ता

एमपीसी न्यूज- एकोणतीस वर्षीय विवाहिता पाच दिवसांपूर्वी खराबवाडी ( ता. खेड ) येथील वाघजाईनगर येथून बेपत्ता असल्याची माहिती चाकण पोलिसांनी दिली.

स्विटी ऐलान कार्लीनियस ( वय २९ वर्षे, सध्या रा. खराबवाडी, वाघजाईनगर, ता.खेड) असे बेपत्ता झालेल्या महिलेचे नाव आहे. तिचा पती ऐलान जोएल कार्लीनियस ( वय ३८ वर्षे, सध्या रा. खराबवाडी, वाघजाईनगर,) यांनी याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

चाकण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार स्विटी हीचा पती ऐलान हा चाकण औद्योगिक वसाहतीतील एका खासगी कंपनीत रोजंदारीवर कामाला आहे. रविवारी ( दि. २० ) सकाळी सात वाजण्याच्या दरम्यान तो कामाला गेल्यानंतर घरात कोणाला काही न सांगता संबंधित महिला दोन लहान मुलांना घरात सोडून निघून गेली आहे. तिचा सर्वत्र शोध घेऊनही काहीच थांगपत्ता लागला नसल्याने ती बेपत्ता असल्याची फिर्याद दाखल करण्यात आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.