Pimpri: केजुबाई बंधाऱ्यात मासे आढळले मृतावस्थेत

एमपीसी न्यूज – पवना नदीवर असलेल्या केजुबाई बंधा-यात काही मासे मृतावस्थेत आढळले आहेत. नाल्यातून रसायन मिश्रित पाण्यामुळे मासे मेल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

पिंपरी-चिंचवडच्या केजुबाई बंधारा ते जाधव घाट या दोन किलोमीटर पात्राच्या सांडपाण्याचे नाले थेट पाणी दूषित करत आहेत. रोटरी क्लबच्या जलपर्णीमुक्त व सांडपाणी विरहित स्वच्छ सुंदर पवनामाई अभियानाअंतर्गत काम सुरु असताना मासे मृत्युमुखी पडल्याचे दिसून आले. गेल्या दोन-तीन दिवसापांसून मासे मृतावस्थेत दिसून येत असल्याचे काही जणांचे म्हणणे आहे. माशांचा खच पडल्याने पाण्याला दुर्गंधी सुटून नदीकाठच्या नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

याबाबत बोलताना महापालिकेचे पर्यावरण कार्यकारी अभियंता संजय कुलकर्णी म्हणाले, ”पाण्याचे नमुने घेतले असून प्रयोगशाळेत तपासणीला दिले आहेत. प्रदूषण नियंत्रण मंडळाला देखील याची कल्पना दिली असून पाण्यात केमिकल आले आहे का ? हे तपासण्यास सांगितले आहे. मासेमारी करणारे छोटे मासे फेकून देतात. फेकून दिलेले छोटे मासे मेले असल्याची शक्यता आहे”.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.