Pimpri News : मॉरिशसला होणाऱ्या विश्व हिंदी अधिवेशन 2023 मध्ये पिंपरीतून दोन वक्ते जाणार 

एमपीसी न्यूज : 9 वे विश्व हिंदी अधिवेशन 2023 हे यावर्षी मॉरिशस येथे संपन्न होणार आहे. मॉरीशस येथील महात्मा गांधी संस्थान आणि दिल्ली येथील भाषा सहोदरी न्यास यांच्या संयुक्त प्रयत्नातून दिनांक 10 जानेवारी या विश्व हिंदी दिनाच्या दिवशी हे आंतरराष्ट्रीय अधिवेशन होणार आहे. (Pimpri News) 10 व 11 जानेवारी रोजी होणाऱ्या अधिवेशनात चर्चा, संवाद, कवी संमेलन आंतरराष्ट्रीय विद्वानांच्या भेटी व परीचर्चा होणार आहेत. या विश्व अधिवेशनासाठी भारतीय जैन संघटना पिंपरी येथील विद्यालयाचे सेवानिवृत्त प्रा.संजय पवार हे वक्ता म्हणून उपस्थित राहणार आहेत.

Akurdi News : डॉ. डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये “तेजस करंडक क्रिकेट टूर्नामेंट” चे यशस्वी आयोजन

तसेच पद्मभूषण वसंतदादा पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय नेहरू नगर पिंपरी च्या प्राचार्या सौ.नेहा पवार ह्या उपस्थित राहणार आहेत. (Pimpri News) या आंतरराष्ट्रीय अधिवेशनात प्रा. संजय पवार “विश्व में हिंदी एवं हिंदी साहित्य का महत्व” या विषयावर आपले विचार व्यक्त करणार असून आंतरराष्ट्रीय कवी संमेलनात आपल्या कविता सादर करणार आहेत. याशिवाय तेथील दूतावास आणि तज्ञांच्या भेटी, स्मारकांच्या भेटी होणार आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.