Nigdi News : शिष्यवृत्ती परीक्षेत चमकले मॉडर्न हायस्कूलचे 14 विद्यार्थी

एमपीसी न्यूज – यमुनानगर निगडी येथील मॉडर्न हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्तीमधील यशाची परंपरा कायम ठेवत या ही वर्षी गुणवत्ता यादीत (Nigdi News) झळकण्याचा विक्रम केला आहे. एकूण 14 विद्यार्थ्यांनी जिल्हा गुणवत्ता यादीत स्थान प्राप्त केले आहे.

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून जुलै 2022 मध्ये इयत्ता 5 वी व इयत्ता 8 वीची शिष्यवृत्ती परीक्षा घेण्यात आली होती. त्या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. या परीक्षेत प्रो. ए. सो. चे मॉडर्न हायस्कूल निगडी या प्रशालेतील एकूण 14 विद्यार्थ्यांनी जिल्हा गुणवत्ता यादीत स्थान प्राप्त केलेले आहे.

इयत्ता 5 वी गुणवत्ता यादीत आलेले विद्यार्थी : देवश्री लांजेवार, अथर्व वासकर, स्वराज मोरे, स्वराज जाधव, स्वराज नारखेडे, प्रांजल शेळके, केतकी कवडे.

इयत्ता 8 वी गुणवत्ता यादीत आलेले विद्यार्थी : गायत्री माने, सुप्रिया साळवे, स्नेहा कांबळे, अभिनव गेजगे, स्वराली हरगुडे, लोकेश नारखेडे, उत्कर्ष कुलकर्णी

Chinchwad News : पोलीस स्थापना दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी घेतली कामकाजाची माहिती

 विद्यार्थ्यांना मीना अधिकारी, श्रीकृष्ण निकम, आशा कुंजीर, उमा बिर्जे, रामचंद्र घाडगे, उमर शेख, अर्चना सुरवसे, मनीषा बोत्रे या शिक्षकांनी मार्गदर्शन केले. संस्थेचे (Nigdi News)कार्याध्यक्ष गजानन एकबोटे, सहसचिव ज्योत्स्ना एकबोटे, शाला समिती अध्यक्ष चिंतामणी घाटे, प्र-मुख्याध्यापिका मृगजा कुलकर्णी, प्राचार्य प्रकाश पाबळे, पर्यवेक्षिका वर्षा पाचारणे यांनी कौतुक करून विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.