Pimpri Chinchwad : सावित्रीबाईंनी महिला सबलीकरणाची चळवळ उभी केली – सहकार मंत्री अतुल सावे

एमपीसी न्यूज – आपण वर्षभर उपक्रम राबवले, तरी दिवस कमीच (Pimpri Chinchwad) पडतील इतके महान कार्य सावित्रीबाई फुलेंनी केले आहे. त्या काळात त्यांनी महिला सबलीकरणाची चळवळ उभी केल्याने आज महिला उच्च पदावर कार्यरत असल्याचे पहायला मिळत आहे. यासाठी त्यांना बऱ्याच गोष्टींचा त्याग करावा लागला. आज सावित्रीबाईंच्या नावाने दिला जाणारा पुरस्कार प्राप्त या समाजातील आदर्शवत महिला आहे, असे मत सहकार व इतर मागास व विशेष मागासवर्ग कल्याण मंत्री अतुल सावे यांनी व्यक्त केले.

महात्मा ज्योतिबा फुले मंडळ पिंपरी चिंचवडच्या वतीने सावित्रीबाई फुले जयंती निमित्ताने विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या 21 महिलांचा ‘क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार-23’ देवून सन्मानित करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. हा पुरस्कार सोहळा चिंचवड येथील कै.प्रा. रामकृष्ण मोरे नाट्यगृहात संपन्न झाला. यावेळी विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ.दिलीप भुजबळ, पुणे मनपा शिक्षण मंडळाचे अध्यक्ष रवींद्र चौधरी, उद्योजक दीपकनाना कुदळे, पिं. चिं.सीए इंस्टिट्यूटचे माजी अध्यक्ष सीए सुहास गार्डी, इंडियन मेडिकल असोसिएशन पिंपरी चिंचवड शाखेचे अध्यक्ष डॉ विजय सातव, राष्ट्रवादी महिला कॉंग्रेसच्या शहराध्यक्ष कविता आल्हाट, माजी नगरसेवक वसंत लोंढे, सुरेश म्हेत्रे, संगीता ताम्हणे, ओबीसी संघर्ष समितीचे अध्यक्ष आनंदा कुदळे, मोहन भूमकर, रेखा दर्शिले, धनंजय वर्णेकर, गणेश दळवी, समिता गोरे, उद्योजक संजय जगताप, भरत आल्हाट, दिशा फौंडेशनचे कार्याध्यक्ष राजू कर्पे, प्रशांत डोके, करमोळीचे सरपंच शरद केदारी, मीना माळी, चित्रपट निर्माते निवृत्ती बोराटे, वंदना जाधव, सोनम जांभूळकर, काळूराम गायकवाड, महात्मा ज्योतिबा फुले मंडळाचे अध्यक्ष हनुमंत माळी आदी उपस्थित होते.

यावेळी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार प्रदान करण्यात आला. पुरस्कारार्थी पुढीलप्रमाणे –

अंजना जमदाडे (आदर्श माता), प्रमिला टिळेकर (आदर्श माता), सुरैय्या सिकंदर शेख फातिमा – (सावित्री पुरस्कार), गुरुमाँ मधु गोस्वामी, (राज्यस्तरीय – आध्यात्म भूषण पुरस्कार), सुनिता राऊत (राज्यस्तरीय कृषी भूषण), मधुरा भेलके (राज्यस्तरीय समाज भूषण), मंजिरीताई धाडगे (राज्यस्तरीय समाज भूषण), विजया गारुडकर – (राज्यस्तरीय उद्योगभूषण), निशा बेलसरे (शिक्षण भूषण पुरस्कार), प्राजक्ता रुद्रवार (शिक्षक भूषणपुरस्कार), प्रमिला गोरे (आदर्श शिक्षिका), पो. निरीक्षक सुचेता खोकले (कर्तव्य भूषण पुरस्कार), वर्षा कांबळे (पत्रकार भूषण पुरस्कार), आशा कांबळे (समाज भूषण), माधुरी कोले (समाज भूषण), रोहिणी रासकर (समाज भूषण), कु.रिद्धी गायकवाड (क्रीडा भूषण पुरस्कार), तृप्ती रामाणे (व्यवसाय भूषण), अश्विनी दर्शले (व्यवसाय भूषण), श्रद्धा कातळे (कला भूषण), सुनिताराजे पवार (साहित्य भूषण पुरस्कार) यांचा समावेश आहे.

Nigdi News : शिष्यवृत्ती परीक्षेत चमकले मॉडर्न हायस्कूलचे 14 विद्यार्थी

कार्यक्रमाचे (Pimpri Chinchwad) प्रास्ताविक अध्यक्ष हनुमंत माळी यांनी केले. सूत्रसंचालन ऋतुजा चव्हाण, पौर्णिमा कोल्हे यांनी केले. तर, आभार महादेव भुजबळ यांनी मानले. कार्यक्रमाचे आयोजन महात्मा फुले मंडळाचे अध्यक्ष हनुमंत माळी, सचिव विश्वास राऊत, कार्याध्यक्ष अनिल साळुंखे, खजिनदार सूर्यकांत ताम्हाणे, उपाध्यक्ष नरहरी शेवते, श्रीहरी हराळे, अमर ताजणे, वैजनाथ माळी, प्रदीप दर्शले, नवनाथ कुदळे, नितीन ताजणे, अनिता ताठे, उर्मिला भुजबळ, अलका ताम्हाणे, स्मिता माळी, कुंदा यादव, संगीता माळी, उर्मिला करपे आदिंनी नियोजन केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.