Akurdi News : डॉ. डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये “तेजस करंडक क्रिकेट टूर्नामेंट” चे यशस्वी आयोजन

एमपीसी न्यूज : डॉ.डी.वाय.पाटील औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालने “तेजस करंडक क्रिकेट टूर्नामेंट” सामन्यांचे पुणे विभागातील फार्मसी महाविद्यालयांच्या (Akurdi News) प्राध्यापक व प्राध्यापकेत्तर कर्मचाऱ्यांसाठी आयोजन केले होते. या दोन दिवसीय सामन्यात प्राथमिक चाचणीनंतर परिसरातील सहा महाविद्यालयांची स्पर्धेसाठी निवड करण्यात आली.

या खेळाचे आयोजक डॉ. वैभव वैद्य यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करत सर्व उपस्थित पाहुण्याचे आणि संघांचे स्वागत केले.“तेजस करंडक क्रिकेट टूर्नामेंट” सामन्यांचे उदघाटन डॉ. डी.वाय. पाटील शैक्षणिक संकुलचे संचालक रिअर ऍडमिरल अमित विक्रम (सेवानिवृत्त) यांच्या उपस्थितीत करण्यात आले व त्यांनी सर्व संघाना शुभेच्छा देऊन त्यांचा उत्साह द्विगुणित केला. संघाना संबोधताना त्यांनी उपस्थित सर्व विद्यार्थी व महिला शिक्षिकांना क्रिकेट सामने खेळण्यास प्रोत्साहन दिले.

उदघाटन प्रसंगी उपस्थित डॉ.डी.वाय.पाटील औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. निरज व्यवहारे, मॉडर्न औषधनिर्माण महाविद्यालय, निगडी चे प्राचार्य डॉ. पी. डी. चौधरी यांनी सुद्धा सर्व खेळाडूंना शुभेच्छा दिल्या. डॉ. व्यवहारे यांनी आरोग्यदायी जीवनासाठी खेळाचे महत्व पटवून सांगितले तसेच खेळ खेळल्याने आपले शारीरिक व मानसिक आरोग्य कसे उत्तम राहू शकते याची काही उदाहरणे दिली.

Pune News : आजपासून राष्ट्रवादी महिला काँग्रेसची जनजागर यात्रा होणार सुरू

या दोन दिवसीय “तेजस करंडक क्रिकेट टूर्नामेंट” मध्ये सामान्याचे विजयी संघ इंदिरा औषधनिर्माण महाविद्यालय, ताथवडे यांना डॉ.डी.वाय.पाटील औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. निरज व्यवहारे यांच्या हस्ते चषक देऊन गौरविण्यात आले. तसेच उप विजेते चषक डॉ. डी. वाय. पाटील औषधनिर्माण महाविद्यालय यांनी मिळविला. मॅन ऑफ दि मॅच डॉ.आमिर शेख (इंदिरा कॉलेज), बेस्ट बॉलर डॉ. राहुल बुचडे(इंदिरा कॉलेज) बेस्ट बॅटमॅन पवन माने (डी. वाय. पाटील कॉलेज आकुर्डी) यांनी पटकावले.

“तेजस करंडक क्रिकेट टूर्नामेंट” या सामान्यांचे आयोजनासाठी डॉ.डी.वाय.पाटील औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयाचे क्रीडा प्रभारी डॉ. वैभव वैद्य, मुकेश मोहिते , (Akurdi News) डॉ. संकेत कदम यांनी कर्तव्यशील परिश्रम घेतले त्याबद्दल प्राचार्यानी त्यांचे कौतुक करत असेच खेळ आयोजित करण्यास प्रोत्साहन दिले. यशाबद्दल डॉ. डी. वाय. पाटील, आकुर्डी संकुलाचे अध्यक्ष सतेज पाटील यांनी सर्व विजयी व उपविजयी संघांचे अभिनंदन केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.