Pune News : आजपासून राष्ट्रवादी महिला काँग्रेसची जनजागर यात्रा होणार सुरू

एमपीसी न्यूज : आजपासून राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या जनजागर यात्रेला सुरुवात होणार आहे. ही यात्रा राज्यभर निघणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसची महिला ‘जनजागर यात्रा’ 288 विधानसभा मतदारसंघात निघणार आहे.(Pune News) या यात्रेचा पहिला टप्पा पश्चिम महाराष्ट्रातून सुरू होणार आहे. पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या उपस्थित बुधवारी (ता.4) पुणे येथे या यात्रेचा शुभारंभ होणार आहे.भाजप सरकारच्या धोरणांविरोधात प्रत्येक विधानसभा मतदारसंघात जाऊन आवाज उठवला जाणार आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला आघाडीच्यावतीने या जनजागर यात्रेचे आयोजन केले असून ‘महागाई’,’बेरोजगारी’ या प्रमुख मुद्यांवर केंद्र व राज्य सरकारला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची महिला शाखा जाब विचारणार आहे. राष्ट्रवादीचे स्थानिक पदाधिकारी,स्थानिक लोकप्रतिनिधी या जनजागर यात्रेत सामील होणार आहे. संपूर्ण राज्यभरात महिला भगिनींकडून याबाबत मोठ्या प्रमाणात जनजागृतीपर जागर यात्रा करण्यात येणार आहे. ही यात्रा महाराष्ट्राच्या प्रत्येक शहर आणि तालुक्यात जाणार आहे.

Alandi News : ज्ञानदा संस्कृत प्रबोधिनी तपःपूर्ति महोत्सवात सावनी रविंद्र यांच्या सुमधुर गायनाने श्रोते मंत्रमुग्ध

गेल्या आठ वर्षात गॅस सिलेंडर, जीवनावश्यक वस्तू , पेट्रोल, डिझेल सीएनजी यांच्या किमतींमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. सर्वसामान्य लोकांच्या खासगी क्षेत्रातील नोकऱ्यांवर आलेली कुऱ्हाड, सुशिक्षित तरुणांवर कोसळलेले बेरोजगारीचे संकट, महाराष्ट्रातून मोठमोठ्या कंपन्या इतर (Pune News) राज्यांमध्ये पळवण्याचे सुरू असलेले उद्योग तसेच राज्यातील लोकशाहीला घातक असणाऱ्या घडामोडी घडत राज्य सरकार पाडण्यासाठी केले गेलेली कट कारस्थाने, महिला भगिनींवर होणारे अत्याचार अशा विविध मुद्द्यांवर ही जनजागर यात्रा काढण्यात येणार आहे.

जनतेला जाग करण्याचं काम ही जन-जागर यात्रा करणार आहे. पुणे शहरातील हॉटेल सेंट्रल पार्क इथं  खासदार शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये या जनजागर यात्रेचा शुभारंभ आज दुपारी चार वाजता करण्यात येणार आहे. त्यानंतर पिंपरी चिंचवड, पुणे ग्रामीण असे करत महाराष्ट्रातील सर्वच विभागांमध्ये ही जनजागृती यात्रा जाणार असल्याची माहिती राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष विद्या चव्हाण यांनी दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.