Maval : लोकसभा मतदारसंघात 3790 दिव्यांग मतदार

एमपीसी न्यूज – मावळ लोकसभा मतदारसंघात 3790 दिव्यांग मतदारांची नोंद करण्यात आली आहे. त्यामध्ये उरण विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक म्हणजेच 861 तर चिंचवड विधानसभा मतदारसंघात सर्वात कमी 379 दिव्यांग मतदार आहेत.

दिव्यांग मतदारांनाही त्यांचा मतदानाचा हक्क बजावता यावा, म्हणून निवडणूक आयोगातर्फे प्रयत्न केले जातात. त्यासाठी दिव्यांग मतदारांची मतदान केंद्रनिहाय यादी तयार करण्यात आली आहे. या मतदान केंद्रांचा आढावा घेऊन तेथे सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत. दिव्यांग मतदार असलेल्या मतदान केंद्र तळमजल्यावर हलविण्यात आले आहेत. जे केंद्र तळमजल्यावर नाहीत अशा ठिकाणी दिव्यांगांसाठी डोलीसह विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

विधानसभा मतदारसंघ आणि मतदान केंद्रनिहाय दिव्यांग मतदारांची यादी तयार करण्यात आली आहे. त्यानुसार मावळ लोकसभा मतदारसंघात 3790 दिव्यांग मतदार आहेत.

मावळ लोकसभा मतदारसंघातील विधानसभा मतदारसंघानिहाय दिव्यांग मतदारांची संख्या 
पनवेल – 719
कर्जत – 758
उरण – 861
मावळ – 579
चिंचवड – 379
पिंपरी – 494
एकूण – 3790

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.