Pimpri : राजर्षी शाहूंचे बहुजन शिक्षणात मोठे योगदान – काशिनाथ नखाते
एमपीसी न्यूज – राजश्री शाहू महाराज हे थोर समाजसुधारक होते. चौथे शाहू या नावाने प्रसिद्ध असलेल्या शाहुनी बहुजानाची आणी कामकरी, कष्टकरी समाजातील मुले शिकावीत यासाठी अथक प्रयत्न केले , त्यासाठी सक्तीचे शिक्षण करण्यासह आरक्षण देऊन ते प्रत्यक्षात आननारे वंदनीय राजे होते असे प्रतिपादन कष्टकरी संघर्ष महासंघाचे अध्यक्ष काशिनाथ नखाते यानी केले.
‘शाहू छत्रपती स्पिनिंग अँड वीव्हिंग मिल’, शाहुपुरी व्यापारपेठ, शेतकऱ्यांची सहकारी संस्था, शेतकी तंत्रज्ञानाच्या संशोधनासाठी ‘किंग एडवर्ड अॅग्रिकल्चरल इन्स्टिट्यूट’ इत्यादी संस्था कोल्हापुरात स्थापण्यात त्यांचा प्रमुख वाटा होता. राधानगरी धरणाची उभारणी, शेतकऱ्यांना कर्जे उपलब्ध करून देणे अशा उपक्रमांतूनही त्यांनी सुमारे १०० वर्षापुर्वी फार मोठा आदर्श समाजापुढे उभा केला त्यांचा आदर्श घेउन आजची पिढी घडणे गरजेचे आहे. प्रास्ताविक आनंद कलाटे यांनी तर आभार वंदना थोरात यांनी मानले.