Chinchwad : सैनिकांच्या प्रती प्रत्येक भारतीयांमध्ये अभिमान असला पाहिजे –  नायक दिगेंद्र कुमार

एमपीसी न्यूज – सैनिकांच्या प्रती प्रत्येक भारतीयांमध्ये अभिमान असला पाहिजे. सैनिक आणि नागरिकांमध्ये आपुलकी निर्माण झाली पाहिजे, असे मत महावीर चक्र विजेते नायक दिगेंद्र कुमार यांनी चिंचवड येथे केले. ते पोलीस फ्रेंड्स वेलफेअर असोसिएशन व व्ही के माटे हायस्कूल यांनी संयुक्तपणे आयोजित केलेल्या कारगिल विजय दिनानिमित्त “शूरा आम्ही वंदिले” या कार्यक्रमामध्ये बोलत होते.

या कार्यक्रमामध्ये कारगिल युद्ध स्वत: लढलेले, महावीर चक्र विजेते दिगेंद्र कुमार यांना पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे उपमहापौर सचिन चिंचवडे, पोलीस फ्रेन्डस् वेलफेअर असोसिएशनचे संस्थापक/ प्रदेशाध्यक्ष गजाननभाऊ चिंचवडे, मुख्याध्यापिका इंद्रायणी पिसोळकर, मेजर प्रताप भोसले, स्वप्निल शेडगे यांच्या शुभहस्ते “शौर्य पुरस्कार” देऊन गौरवण्यात आले. यावेळी निखिल येवले, वर्षा देवकर, हेमंत दुराफे, जितेन्द्र निजामपुरकर, विनेष भोजे, शुभांगी सरोटे, अमेय देशपांडे, शुभम चिंचवडे, संदीप गायकवाड, अभिजित चांदलेकर, प्रियांका तायडे, वर्षा अगरवाल, निलकमल घोष, गणेश गजेगा, अक्षय पवार, निखिल कलाटे, शुभम ससे, अमोल हिरासकर प्रितम सोनावणे, गोविंद लबडे आदी उपस्थित होते.

पुढे बोलतांना नायक दिगेंद्र कुमार म्हणाले की, सोपे काम तर कुणीही करू शकतो पण अवघड काम सोपे करण्यासाठीच सेनेत गेल्याचे त्यांनी सांगितले. आजच्या तरुण पिढीमध्ये देशाविषयी देशभक्ती जागृत करण्याची गरज आहे, तरुणांनी जर ठरवले तर देशात आणखी बदल घडतील. लढताना आलेला अनुभव त्यांनी सांगितला. गजाननभाऊ चिंचवडे यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हौस्या परिहार्या यांनी तर आभार राजश्री अवचरे यांनी मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.