Pimpri : राजर्षी शाहूंचे बहुजन शिक्षणात मोठे योगदान – काशिनाथ नखाते   

एमपीसी  न्यूज – राजश्री शाहू महाराज हे थोर समाजसुधारक होते. चौथे शाहू या नावाने प्रसिद्ध असलेल्या शाहुनी बहुजानाची आणी कामकरी, कष्टकरी समाजातील  मुले शिकावीत  यासाठी अथक प्रयत्न केले , त्यासाठी सक्तीचे शिक्षण  करण्यासह आरक्षण  देऊन ते  प्रत्यक्षात आननारे  वंदनीय राजे होते असे प्रतिपादन कष्टकरी  संघर्ष महासंघाचे अध्यक्ष  काशिनाथ नखाते यानी केले.

कष्टकरी संघर्ष महासन्घातर्फे  चिंचवड येथे राजर्षी शाहू जयंती चे आयोजन करण्यात आले, यावेळी उपाध्यक्ष  राजेश माने, मिडिया प्रमुख उमेश डोर्ले  ओमप्रकाश मोरया, मिथून राठोड ,अबेदाबेगम शेख,मिनाक्षी जाधव,सोनम पारवे,महादेवी कटकधोड,शारदा खंडागळे,आशा  वाकळे,नमिता  शिंदे,छाया शिंदे, माया शेटे आदी कामगार बांधव उपस्थित  होते.
महाराजांनी बहुजन समाजात शिक्षणप्रसार करण्यावर विशेष भर दिला. त्यांनी कोल्हापूर संस्थानात प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत केले. स्त्री शिक्षणाचा प्रसार व्हावा म्हणून त्यांनी राजाज्ञा काढली. अस्पृश्यता नष्ट करण्याच्या दृष्टीने त्यांनी इ.स. १९१९ साली  वेगळ्या शाळा भरवण्याची पद्धत बंद केली आणी सर्वांना एकत्र शिक्षण केले. बहुजन समाजाला राजकीय निर्णयप्रक्रियेत सामावून घेण्यासाठी  निपाणी येथे ‘डेक्कन रयत असोसिएशन’ ही संस्था स्थापली. वेदोक्त मंत्र म्हणण्याच्या अधिकारावरून झालेले वेदोक्त प्रकरण शाहू महाराजांच्याच काळात झाले.

‘शाहू छत्रपती स्पिनिंग अँड वीव्हिंग मिल’, शाहुपुरी व्यापारपेठ, शेतकऱ्यांची सहकारी संस्था, शेतकी तंत्रज्ञानाच्या संशोधनासाठी ‘किंग एडवर्ड अ‍ॅग्रिकल्चरल इन्स्टिट्यूट’ इत्यादी संस्था कोल्हापुरात स्थापण्यात त्यांचा प्रमुख वाटा होता. राधानगरी धरणाची उभारणी, शेतकऱ्यांना कर्जे उपलब्ध करून देणे अशा उपक्रमांतूनही त्यांनी  सुमारे १०० वर्षापुर्वी फार मोठा आदर्श समाजापुढे  उभा केला त्यांचा  आदर्श घेउन  आजची पिढी घडणे  गरजेचे आहे. प्रास्ताविक आनंद  कलाटे  यांनी तर आभार वंदना थोरात यांनी मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.