Vadgaon : ‘शरद भोजन योजने’अंतर्गत 432 लाभार्थ्यांना धान्य वाटप

Distribution of foodgrains to 432 beneficiaries under 'Sharad Bhojan Yojana

एमपीसीन्यूज – पुणे जिल्हा परिषद समाज कल्याण विभाग,पुणे यांच्या माध्यमातून वडगाव नगरपंचायत वतीने व नगरसेविका पुजा विशाल वहिले यांच्या प्रयत्नातून प्रभाग क्र 6 मधील 123 कुटुंबातील 432 लाभार्थ्यांना ‘शरद भोजन योजने’अंतर्गत आज धान्य वाटप करण्यात आले.

कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर पुणे जिल्हा परिषदेने सर्वसामान्यांसाठी महत्त्वपूर्ण अशी शरद भोजन योजना सुरु केली. शिधापत्रिका नसलेली कोणतीही व्यक्ती उपाशी राहणार नाही हा उद्देश डोळ्यासमोर ठेऊन गरजू कुटुंबाना धान्य देण्याची व्यवस्था पुणे जिल्हा परिषदेच्या माध्यमातून वडगाव नगरपंचायत ही योजना राबवित आहे.

पुणे जिल्हा परिषद कृषी व पशुसंवर्धन समितीचे सभापती बाबुराव वायकर यांच्या विशेष प्रयत्नातून व नगराध्यक्ष मयुर ढोरे, उपनगराध्यक्षा माया चव्हाण व सर्व नगसेवक व नगरसेविका याच्या पाठपुराव्यातुन सर्व लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.

तसेच मावळचे आमदार सुनिल शेळके यांच्या निधीतून व वडगाव नगरपंचायतच्या माध्यमातून प्रभाग क्र 6 मध्ये सुमारे 1800 मास्क वाटप करण्यात येणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.