Sharad Pawar Birthday News : शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त कोरोना योद्धयांचा सत्कार

नगरसेविका प्रज्ञा खानोलकर आणि माजी नगरसेवक मनोज खानोलकर यांचा स्तुत्य उपक्रम

एमपीसीन्यूज : माजी केंद्रीय कृषिमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका प्रज्ञा खानोलकर आणि माजी नगरसेवक मनोज खानोलकर यांच्या वतीने आज, शनिवारी किवळे-विकासनगर परिसरातील डॉक्टर, परिचारिका, सफाई कामगार आदी कोरोना योद्धयांचा गौरव करण्यात आला.

नगरसेविका प्रज्ञा खानोलकर आणि माजी नगरसेवक मनोज खानोलकर यांच्या हस्ते त्यांच्या किवळे-विकासनगर येथील जनसंपर्क कार्यालयात हा कार्यक्रम पार पडला. यावेळी राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या शहर उपाध्यक्षा अर्चना राऊत उपस्थित होत्या.

यावेळी कोरोना योद्धे डाॅ. कोमल यल्लूरवार, डाॅ. भाग्यश्री शिंदे, डाॅ. शितल कुदळे, डाॅ. चौधरी, डाॅ. सुदीप रसाळ,डाॅ. रफीक धावड, डाॅ. भुषण कुलकर्णी, डाॅ. देवानंद तायडे, डाॅ. गणेश विभुते, परिचारिका शालू जाधव, गंगा सलगर, अवंतिका काललकर, प्रिया गायकवाड, पल्लवी वाघमारे, करण हनवते, खंडू काले, तसेच ‘पीएमपी’चे जगदीश ठाकूर, महावितरण, महापालिका पाणीपुरवठा, आरोग्य विभागाचे कर्मचारी व सर्व साफसफाई कामगार यांचा कोरोना योद्धा प्रमाणपत्र, पुष्प व भेट वस्तू देऊन गौरवण्यात आले.

या वर्षी कोरोना संकट आले. त्यात अनेकांचे प्राण गेले. आर्थिक घडी विस्कळीत झाली. अनेकांचे रोजगार केले. कोरोना संकटातही स्वतःच्या जीवाची पर्वा न करता समाजासाठी कार्यरत असलेल्या डॉक्टर, वैद्यकीय कर्मचारी, सफाई कामगार व सर्वसामान्य जनतेसाठी जीवनावश्यक मदत पोहोच करणाऱ्या कोरोना योद्धयांचे कार्य महान आहे.

या कार्याचा उचित गौरव व्हावा, या उद्देशाने या कोरोना योद्धयांचा सन्मान करण्यात आल्याची माहिती माजी नगरसेवक मनोज खानोलकर यांनी दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.