Maharashtra Corona Update : राज्यात आज 4,259 नवे रुग्ण, 80 रुग्णांचा मृत्यू

एमपीसी न्यूज – राज्यात आज, शनिवारी 4 हजार 259 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली तर, 80 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 18 लाख 76 हजार 699 एवढी झाली आहे.

आरोग्य विभागाने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, राज्यात आज 3 हजार 949 बरे झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला.

राज्यातील कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या 17 लाख 53 हजार 922 एवढी झाली आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 93.46 टक्के झाले आहे. राज्यात सध्या 73 हजार 542 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

राज्यात आज 80 रुग्णांचा मृत्यू झाला असून आतापर्यंत राज्यात 48 हजार 139 रुग्ण कोरोनामुळे मृत्यूमुखी पडले आहेत. राज्याचा कोरोना मृत्यूदर 2.57 टक्के एवढा आहे. राज्याचा रिकव्हरी रेट चांगला असला तरी, मृत्यूदर कमी करण्याचं आरोग्य विभागासमोर आव्हान आहे.

राज्यात आतापर्यंत 1 कोटी 16 लाख 38 हजार 336 नमूने तपासण्यात आले आहेत. त्यापैकी 18 लाख 76 हजार 699 एवढे नमूने सकारात्मक आले आहेत. राज्यात सध्या 5 लाख 25 हजार 623 जण होम क्वारंटाईन आहेत तर, 4 हजार 500 जण संस्थात्मक क्वारंटाईन आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.