NCP Breaking News : राष्ट्रवादीचे चिन्ह आणि पक्ष अजित पवार गटाला; शरद पवार यांना निवडणूक आयोगाचा मोठा धक्का

एमपीसी न्यूज : आगामी निवडणूक जवळ (NCP Breaking News) येत असताना महाराष्ट्रात मोठी बातमी समोर आली आहे. शिंदे गटाप्रमाणे बंडखोरी केलेल्या अजित पवार यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे चिन्ह मिळाले आहे. यामुळे अध्यक्ष शरद पवार यांना निवडणूक आयोगाकडून मोठा धक्का बसला आहे.

आयोगाने अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील गटालाच खरी राष्ट्रवादी काँग्रेस घोषित केले आहे. या सुनावणीनंतर निवडणूक आयोगाने आपला निर्णय राखून ठेवला होता. आयोगाने आपल्या निर्णयात अजित पवार यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह दिले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर अजित पवार यांनी निवडणूक आयोगाकडे दावा केला होता.

Maarashtra : महाराष्ट्रातील रक्तरंजित घटनेची सर्वोच्च न्यायालयानेच सुमोटो दखल घ्यावी; काँग्रेसतर्फे आवाहन

यानंतर आयोगात सुनावणी झाली. आयोगाच्या निर्णयानंतर अजित पवारांच्या छावणीत खरी राष्ट्रवादी असेल. आयोगाचा निर्णय अशा वेळी आला आहे जेव्हा महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना राष्ट्रवादीच्या आमदारांच्या अपात्रतेबाबत 15 फेब्रुवारीपर्यंत निर्णय द्यायचा आहे.

निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर अजित पवारांना आता पक्षाचे निवडणूक (NCP Breaking News) चिन्ह वापरता येणार आहे. आयोगाने आपल्या निर्णयात म्हटले आहे की, सर्व पुराव्यांच्या आधारे अजित यांचा गट खरा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मानला जात आहे. गेल्या वर्षी 2 जुलै रोजी अजित पवार 40 आमदारांसह भाजप आणि शिवसेना (शिंदे) यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये सामील झाले होते. त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादीवर दावा केला. त्यानंतर निवडणूक आयोगाची सुनावणी झाली. आयोगाने पक्षाची घटना आणि बहुमताच्या आधारे निर्णय दिला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.