NCP : आमदार रोहित पवार यांच्या चौकशीचा राष्ट्रवादी काँग्रेसकडून निषेध, पिंपरीत आंदोलन

एमपीसी न्यूज – राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते (NCP) आमदार रोहित पवार यांच्या ईडीमार्फत होणाऱ्या चौकशीच्या विरोधात पिंपरी-चिंचवड राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरुन निषेध केला. पिंपरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात दोन तास ठिय्या मांडून या चौकशीप्रकरणी सरकारविरोधात कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली.

यावेळी कार्याध्यक्ष देवेंद्र तायडे, वरिष्ठ उपाध्यक्ष काशिनाथ जगताप, महिला अध्यक्षा ज्योतीताई निंबाळकर, युवक अध्यक्ष इमरान शेख, सरचिटणीस शकुंतला भाट, नेते गणेश भोंडवे, सुलक्षणाताई धर, ज्येष्ठ नेते शिरीष जाधव, चिंचवड विधानसभा अध्यक्ष सागर चिंचवडे माजी उपमहापौर विश्रांती ताई पाडळे, उद्योग आणि व्यापार सेलचे अध्यक्ष विजयकुमार पिरंगुटे, सामाजिक न्याय अध्यक्ष मयूर जाधव, राष्ट्रवादी युवकचे प्रदेश सरचिटणीस प्रशांत सपकाळ, अल्पसंख्यांक अध्यक्ष अल्ताफ शेख, कामगार आघाडीचे अध्यक्ष संदीप शिंदे, ओबीसी सेल अध्यक्ष विशाल जाधव,संघटक राजू खंडागळे,विवेक विधाते,संदीप गायकवाड,सचिव योगेश सोनवणे,ग्राहक सेल अध्यक्ष संजय पडवळ,संतोष माळी, धुमाळ, गणेश भांडवलकर, बापू सोनवणे, राजरत्न शीलवंत, स्वप्नाली असोले, कैलास बनसोडे, अविनाश कांबळे आदी सहभागी झाले होते.

Talegaon : पीएमटी वाहक चालकाशी घातलेल्या हुज्जतीवरून महिले विरोधात गुन्हा दाखल

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी (NCP) काँग्रेस पक्षाचा एक गट फुटून सरकारमध्ये सामील झाला असला तरी राष्ट्रवादी काँग्रेसचे असंख्य कार्यकर्ते आणि पदाधिकारी हे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यासोबत लढत आहेत आणि त्यातील एक महत्त्वाचे नाव म्हणजे आमदार रोहित पवार हे आहे. ते आपले आजोबा शरद पवार यांच्या बाजूने खंबीरपणे उभे आहेत.

शिव-फुले-शाहू-आंबेडकरांची पुरोगामी विचारधारा आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर निष्ठा ठेवून त्यांनी फुटीर गटाविरोधात राज्यभरात रान पेटवले आहे आणि राज्यातील सामान्य नागरीक, विद्यार्थी, युवा, शेतकरी, महिला यांच्या मुद्द्यांवरही ते सरकारला कोंडीत पकडण्याचे काम करत आहेत. केवळ आपल्या मतदारसंघापुरतेच मुद्दे ते मांडत नाहीत तर राज्यातील विविध घटकांचे मुद्दे ते आक्रमकपणे मांडत आहेत. आमदार म्हणून विधानसभेत आणि रस्त्यावरची लढाईही आमदार रोहित पवार हे लढत असल्याचे दिसते. यामुळेच घाबरलेल्या सरकारने त्यांच्या मागे आता चौकशीचा ससेमिरा लावल्याचा आरोप कामठे यांनी केला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.