Lonavala News: राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व सेल सर्वसामान्य जनतेच्या सेवेसाठी सक्रिय काम करतील – गणेश खांडगे
एमपीसी न्यूज – सर्वसामान्य जनतेच्या सेवेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व सेल सक्रिय होऊन काम करतील, असा विश्वास मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष गणेश खांडगे यांनी व्यक्त केला.
मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे नवनिर्वाचित तालुकाध्यक्ष गणेश खांडगे यांनी आज वडगाव मावळ येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सहकार, ज्येष्ठ नागरिक, ओबीसी,भटक्या विमुक्त, आदिवासी, डाॅक्टर, लिगल, अल्पसंख्याक, किसान, औद्योगिक व व्यापार, सोशल मीडिया, क्रीडा, सामाजिक न्याय विभाग, सेवादल, सरपंच परिषद, कामगार, चित्रपट कला व सांस्कृतिक, पदवीधर, दिव्यांग या सर्व सेलच्या कार्यकर्त्यांची आढावा बैठक घेतली. यावेळी खांडगे यांनी हा विश्वास व्यक्त केला.
या सर्व सेलचे अध्यक्ष अनुक्रमे नामदेव शेलार, विष्णू शिंदे, मंगेश खैरे, दतात्रय गिरीगोसावी, विक्रम हेमाडे, राजेंद्र येळवंडे, सोमनाथ पवळे, अफताब सय्यद, दिगंबर आगीवले, नवनाथ हरपुडे, संजय शेडगे, विक्रमसिंह देशमुख, विकी लोखंडे, जालिंदर शेटे, सुनील भोंगाडे, मंगेश राणे, वेदांग महाजन, अविनाश बधाले, सुभाष शेडगे यांनी आपआपल्या सेलच्या कामाचा आढावा देऊन आगामी काळात पक्ष संघटना वाढीसाठीच्या सूचना मांडल्या.
ज्येष्ठ नागरिक सेलच्या वतीने ज्येष्ठ नागरिकांना ओळखपत्र मिळावी, ग्रामीण भागातून शहरात कामासाठी जाणाऱ्या प्रवाशी नागरिकांना पीएमपीएलचे ओळखपत्र वडगाव शहरात उपलब्ध व्हावे तसेच पास सेंटर उपलब्ध व्हावे. वैद्यकीय सुविधेसाठी विभाग निहाय आरोग्य शिबिर घेण्याच्या सूचना ज्येष्ठांनी केल्या. तालुक्यातील आदिवासी बांधवांच्या सोयीसाठी आदिवासी प्रकल्प विभागीय कार्यालय वडगाव मावळ येथे सुरू करावे, अशी मागणी केली.
पक्षाच्या या सेल सह आपत्कालीन मदत सेल स्थापन करण्याची घोषणा खांडगे यांनी याप्रसंगी केली. राष्ट्रवादी काँग्रेस ज्येष्ठ नागरिक सेलच्या तळेगाव शहर अध्यक्ष नंदकुमार सोपना कोतुळकर, कामशेत शहर अध्यक्ष पदी बाबुराव पवार, वाकसई गण अध्यक्ष पदी बबनराव येवले, तालुका उपाध्यक्ष पदी सुधाकर वाघमारे, वडेश्वर गण अध्यक्ष पदी शांताराम जगताप यांची निवड करण्यात आली.