Lonavala Sprots News: तुषार येवले मावळ चषक किताबाचा मानकरी

एमपीसी न्यूज – मावळ चषक कुस्ती स्पर्धेत आढले येथील राष्ट्रीय कुस्तीगीर तुषार मोहन येवले याने कल्हाट येथील विद्यापीठ चॅम्पियन युवा मल्ल अदित्य जालिंदर करवंदे याला चितपट करून मानाचा मावळ चषक किताब पटकावला.

पुणे जिल्हा कुस्तीगीर संघ व मावळ तालुका कुस्तीगीर संघाच्या मान्यतेने मावळ मल्लसम्राट प्रतिष्ठान, आमदार सुनीलआण्णा शेळके युवा मंच व स्व. पै.सचिनभाऊ शेळके मित्र परिवार यांनी ही स्पर्धा आयोजित केली होती. मयुर सुपे, साईनाथ ठाकर, धिरज शिंदे, कार्तिक आडकर, शौर्य गोपाळे, ओंकार भोते, तेजस कारके, साहिल आंद्रे, अदित्य सावंत, प्रतिक येवले, सनी केदारी, केतन घारे यांनी आपआपल्या वजनी गटात अजिंक्यपद पटकावले आहे.

स्पर्धेचे उद्घाटन आमदार सुनील शेळके व ऑलंपिकवीर मारुती आडकर, अखिल भारतीय विद्यापीठ चॅम्पियन पै.चंद्रकांत सातकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष दिपक हुळावले, राष्ट्रीय कुस्तीगीर पै.संभाजी राक्षे, विद्यापीठ चॅम्पियन पै. सचिन घोटकुले, मावळ तालुका कुस्तीगीर संघाचे उपाध्यक्ष खंडू वाळूंज, मनोज येवले, सचिव पै. बंडू येवले, सहसचिव पप्पू कालेकर, पै.तानाजी कारके, मल्ल सम्राट प्रतिष्ठानचे संस्थापक पै.नवनाथ बोडके, स्पर्धा संयोजक संतोष मोहोळ, अंकुश काळे, रविंद्र उंबरकर, माऊली कालेकर, विकास पवार, सचिन थोरात, बाळासाहेब आखाडे, गोरक्ष वरघडे, स्वप्नील सावंत, राम धनवे, अंकुश पडवळ, मच्छिंद्र बोडके, सुरेश दळवी, अभिजित कानगुडे आदि उपस्थित होते.

किशोर विभाग :

25 किलो- 1) मयुर सुपे (माळेगाव), 2) मानव थोरात (उर्से)

32 किलो- 1) साईनाथ ठाकर (येळसे), 2) इंद्रजित जांभुळकर (तळेगाव)

35 किलो- 1) धिरज शिंदे (उर्से), 2) समर्थ आखाडे ( शिळीम)

38 किलो -1) कार्तिक आडकर (शिवली), २) संकल्प चांदेकर (आढले)

42 किलो- 1) शौर्य गोपाळे (शिरगाव), 2) रोशन काठे ( माळेगाव)

कुमार विभाग :

45 किलो- 1) ओंकार भोते (परंदवडी), 2) युवराज सातकर ( कान्हे)

51 किलो- 1) तेजस कारके (आढे), 2) ओम भरणे ( येलघोल)

55 किलो -1)  साहिल आंद्रे (नाणे), 2) प्रणव चांदेकर (आढले)

57 किलो- 1) अदित्य सावंत ( गोडूंब्रे), 2) राकेश सुतार (आढे)

61 किलो- 1) प्रतिक येवले (गोडूंब्रे), 2) अभिषेक हिंगे (पिंपळखुटे)

65 किलो- 1) सनी केदारी (कुसगाव), 2) सनी कालेकर (काले)

70 किलो- 1) केतन घारे (सडवली),  2) सुजल वाळूंज ( शिवणे).

खुलागट :

1) तुषार येवले (आढले), 2) अदित्य करवंदे (कल्हाट)

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.