Maval News: पवनानगर येथे शिवजयंतीनिमित्त ढोल-लेझीम स्पर्धेत नवनाथ तरुण मंडळ प्रथम

एमपीसी न्यूज – सार्वजनिक शिवजयंती उत्सव पवनमावळ यांच्या वतीने पवनानगर येथे रविवार (दि.20) भव्य ढोल-लेझीम स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये थेऊर पुणे येथील नवनाथ तरुण मंडळाच्या ढोल-लेझीम पथकाने प्रथम क्रमांकाचा मान मिळविला.

 

पवनमावळ येथील सिंहगर्जना तरुण मंडळ सावंतवाडी हे ढोल लेझीम द्वितीय क्रमांकाचे मानकरी ठरले. तृतीय क्रमांक हनुमान तरुण मंडळ बोरज, चतुर्थ क्रमांक रसाई देवी ढोल लेझीम पथक, वडगाव तर डोणू आई ढोल लेझीम पथक डोणे हे पाचव्या क्रमांकाचे मानकरी ठरले. स्पर्धेमध्ये ढोल लेझीम पथकांची मोठी चुरस पहायला मिळाली.

 

यावेळी माजी उपसरपंच सचिन मुर्‍हे, गोधाम इको व्हिलेजचे संस्थापक नितीन घोटकुले, भाजपा माजी अध्यक्ष बाळासाहेब घोटकुले, पवना फुल उत्पादक संघाचे अध्यक्ष मुकुंद ठाकर, माजी उपसरपंच दिलीप राक्षे, संघटन मंत्री गणेश ठाकर, उपाध्यक्ष ज्ञानेश्वर ठाकर, उपसरपंच विशाल मुर्‍हे, नितीन मुर्‍हे  पवन मावळ शिवजयंती उत्सव अध्यक्ष निलेश कालेकर, संदीप काळे यांच्या सह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

 

या कार्यक्रमाचे आयोजन बबलु कालेकर, खजिनदार गणेश सावंत, सुनिल ढोरे, विनोद कालेकर, जयवंत घारे, नितीन आडकर, सजन बोहरा, रविंद्र कदम, मंगेश आढाव, भाऊ मोरे, जमिर मुलाणी, राहुल मोहोळ, केशव कालेकर, निलेश ठाकर, दिपक आडकर, दिनकर ढोरे, तसेच  सरपंच अशोक राजिवडे युवा मंच च्या वतीने करण्यात आले होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.