Theft News : अवघ्या पाऊण तासात घरातून 13 लाखांचे दागिने व वापरातील वस्तूही चोरीला
एमपीसी न्यूज – चोरट्यांनी पहाटे अवघ्या पाऊण तासात घरातील केवळ दागिनेच नाही तर वापरातील वस्तूही चोरून नेल्या आहेत. हा प्रकार शुक्रवारी (दि.4) पहाटे अडिच ते साडे तीन या कालावधीत घडला.
याप्रकरणी एका महिलेने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून तीन अज्ञात इसमा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मोबाईल चोरताना हटकले म्हणून रिक्षाचालकावर चाकुने केले वार
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा मांजरी येथील फ्लॅट बंद असताना चोरट्यांनी घराच्या मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. यावेळी त्यांनी घरातील कपाट उचकटून त्यातून दागिने, रोख रक्कम व घरातील नवे-जुने असे वापरातील सामान असा एकूण 13 लाख 86 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. याप्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.