Talegaon : कातवी मधून ऑफिस कंटेनर चोरीला

एमपीसी न्यूज – कातवी येथून ऑफिस कंटेनर (Talegaon)चोरीला गेले. ही घटना शनिवारी (दि. 17) सकाळी उघडकीस आली.

नईम इसाकभाई मुलाणी (वय 34, रा. तळेगाव दाभाडे) यांनी याप्रकरणी(Talegaon) तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञाताच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Talegaon Dabhade : समर्थ शलाका शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल जाहीर; विजेत्या विद्यार्थ्यांना हजारो रुपयांची बक्षिसे

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी मुलानी  यांनी कातवी येथे ऑफिस कंटेनर ठेवले होते. गुरुवारी (दि. 15) सकाळी नऊ ते शनिवारी (दि. 17) सकाळी 11 वाजताच्या कालावधीत अज्ञात व्यक्तीने दीड लाख रुपये किमतीचे ऑफिस कंटेनर चोरून नेले. तळेगाव एमआयडीसी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.