Talegaon Dabhade : समर्थ शलाका शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल जाहीर; विजेत्या विद्यार्थ्यांना हजारो रुपयांची बक्षिसे

एमपीसी न्यूज – नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळ व कै. ॲड्. कु. शलाका संतोष खांडगे (Talegaon Dabhade)चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमानाने समर्थ शलाका शिष्यवृत्ती परीक्षा मार्गदर्शन केंद्र,तळेगाव दाभाडे यांच्या वतीने समर्थ शलाका शिष्यवृत्ती स्पर्धा परीक्षा घेण्यात आली.या परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून सुमारे 53 हजार 500 रुपयांची पारितोषिके विद्यार्थ्यांनी मिळवली आहेत, अशी माहिती नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाचे सचिव व प्रकल्प प्रमुख संतोष खांडगे, सह प्रकल्प प्रमुख सोनबा गोपाळे गुरुजी यांनी पत्रकार परिषदेत दिली.

समर्थ शलाका शिष्यवृत्ती स्पर्धा परीक्षा शैक्षणिक वर्ष 2023 – 24 या वर्षात इ. 4 थी, 7 वी, 9 वी व11 वी चे एकूण 1350 विद्यार्थी बसले होते. या परीक्षेत विद्यार्थ्यांनी घवघवीत यश प्राप्त करून सुमारे 53 हजार 500 रुपयांची पारितोषिके मिळवली.

संस्थेच्या वतीने सर्व प्राथमिक, माध्यमिक व उच्च विद्यालयात (Talegaon Dabhade)शाळा पातळीवर प्रथम परीक्षा दि.19 जानेवारी 2024 रोजी घेण्यात आली. गतवर्षी प्रमाणे इ.9 वी च्या पात्र विद्यार्थ्यांची अंतिम परीक्षा दि. 12 फेब्रुवारी 2024 रोजी संस्थेची ऐतिहासिक शाळा नवीन समर्थ विद्यालयामध्ये घेण्यात आली. त्याच दिवशी पेपर तपासणी करण्यात आली.यामध्ये इ. 4 थी, 7 वी, 9 वी व 11 वी च्या वर्गातील प्रथम क्रमांक, द्वितीय क्रमांक,तृतीय क्रमांक, व 2 उत्तेजनार्थ क्रमांक काढण्यात आले. तसेच शाळानिहाय प्रथम क्रमांक काढण्यात आले. ही परीक्षा राज्यशासनाच्या शिष्यवृत्ती परीक्षा व MPSC व UPSC च्या धर्तीवर घेण्यात आली. यामुळे विद्यार्थ्यांना भविष्यात स्पर्धात्मक परीक्षेची तोंड ओळख होण्यास व प्रशासन व्यवस्थेकडे जाण्यास मदत होणार आहे. या परीक्षेसाठी अतिशय पारदर्शी यंत्रणा संस्थेने उभी केली होती.

संस्था आजपर्यत अव्यातपणे हे ज्ञानदानाचे काम पुढे नेत आहे. भविष्यात या संस्थेतून शिक्षण घेऊन बाहेर पडलेले विद्यार्थी स्पर्धेत व भारतीय प्रशासनात अधिकारी म्हणून यावेत यासाठी त्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढण्यासाठी संस्थेने गतवर्षीपासून समर्थ शलाका शिष्यवृत्ती परीक्षा सुरु केलेली आहे. या परीक्षेस विद्यार्थी आणि पालकांकडून या उपक्रमाला उत्पुर्त प्रतिसाद मिळाला. या अभिनव उपक्रमास पालक,समाज यांकडून स्वागत होत आहे.

संस्थेचे आधारस्तंभ व शिक्षणमहर्षी मावळभूषण माजी आमदार कृष्णराव भेगडे साहेब यांचे संकल्पनेनुसार तसेच संस्थेचे कार्यक्षम सचिव व प्रकल्प प्रमुख संतोष खांडगे यांच्या
मार्गदर्शनाखाली उत्तम नियोजन करण्यात आले होते.यासाठी प्रकल्प सहप्रमुख सोनबा गोपाळे (गुरुजी) यांचे मोलाचे सहकार्य लाभले. तसेच संस्थेचे अध्यक्ष संजय तथा बाळा भेगडे,उपाध्यक्ष गणेश खांडगे, खजिनदार राजेश म्हस्के,सहसचिव नंदकुमार शेलार तसेच शाळा समिती
अध्यक्ष दामोदर शिंदे,यादवेंद्र खळदे, महेशभाई शहा व विनायक अभ्यंकर यांनी चांगल्याप्रकारे सहकार्य केले. तसेच सर्व शाळेतील मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी
आणि संस्था प्रशासन यांनी विशेष परिश्रम घेतले.

समर्थ शलाका शिष्यवृत्ती परीक्षा शैक्षणिक वर्ष 2023- 24 निकाल

पैसाफंड प्राथमिक शाळा

▪️इयत्ता 4 थी अंतिम निकाल

प्रथम क्रमांक-कु. पुकळे सप्ताश्व सतीश
द्वितीय क्रमांक-कुमारी भालशंकर
मुग्धा महादेव

तृतीय क्रमांक-कु. बारवकर समर्थ
नंदकुमार
1 उत्तेजनार्थ शिष्यवृत्ती-कुमारी कदम
सानिका विजय

2 उत्तेजनार्थ शिष्यवृत्ती-कुमारी पाडेकर स्वरा नितीन

शाळेनुसार प्रथम क्रमांक ( प्रोत्साहनपर ) पवना प्राथमिक विद्या मंदिर

प्रथम क्रमांक- कु. वाघे स्वरूपा
संजीवन

▪️इयत्ता 7 वी अंतिम निकाल
क्रमांक
प्रथम क्रमांक – कु.सांगळे चिन्मय सचिन प्रगती विद्या मंदिर
द्वितीय क्रमांक-कु. कामनवार शुभम
राजेश प्रगती विद्या मंदिर
तृतीय क्रमांक – काळे यश दिनेश पवना विद्या मंदिर
1 उत्तेजनार्थ शिष्यवृत्ती-कु.निकम ओम सुनील नवीन समर्थ विद्यालय
2 उत्तेजनार्थ शिष्यवृत्ती-कु.हरिश्चंद्रे विवेक अरुण नवीन समर्थ विद्यालय

शाळेनुसार प्रथम क्रमांक (प्रोत्साहनपर )

प्रथम क्रमांक- कुमारी शिंदे संस्कृती
सचिन ॲड. पु. वा. परांजपे विद्या मंदिर
प्रथम क्रमांक-कु.उगले विशाल विजय श्री एकवीरा विद्या मंदिर

▪️इयत्ता 9 वी अंतिम निकाल
प्रथम क्रमांक- कु अहिरे आर्या गणेश (श्री एकवीरा विद्या मंदिर)
द्वितीय क्रमांक-कु शिंदे स्नेहल विठ्ठल (श्री एकवीरा विद्या मंदिर)
तृतीय क्रमांक- कु ढमाले पल्लवी संतोष (श्री एकवीरा विद्या मंदिर)
1 उत्तेजनार्थ शिष्यवृत्ती- कु. गवळी राहुल रामभाऊ (प्रगती विद्या मंदिर)

2 उत्तेजनार्थ शिष्यवृत्ती- कु.गरुड अक्षर संजय (श्री एकवीरा विद्या मंदिर)

शाळेनुसार प्रथम क्रमांक (प्रोत्साहनपर )

प्रथम क्रमांक-ॲड. पु. वा. परांजपे विद्या मंदिर कु. कांबळे दक्ष तात्याबा

प्रथम क्रमांक – नवीन समर्थ विद्यालय कु नरुते अनुष्का नवनाथ
प्रथम क्रमांक- श्री छत्रपती शिवाजी विद्या मंदिर कु.हरेर आदित्य रमेश
प्रथम क्रमांक-पवना विद्या मंदिर
कु तुपे अनुष्का ज्ञानेश्वर

▪️इयत्ता 11 वी अंतिम निकाल

प्रथम क्रमांक-कु तुपे दिक्षा गोपाळ (पवना ज्युनियर कॉलेज)
द्वितीय क्रमांक- कु.लोहोर चैतन्य विजय (पवना ज्युनियर कॉलेज)
तृतीय क्रमांक- दळवी भूषण नंदू (पवना ज्युनियर कॉलेज)
1 उत्तेजनार्थ शिष्यवृत्ती-कु.पांडे धनश्री नारायण (पवना ज्युनियर कॉलेज)

2 उत्तेजनार्थ शिष्यवृत्ती- कु.पडवळ दिक्षा अशोक(पवना ज्युनियर कॉलेज)

शाळेनुसार प्रथम क्रमांक (प्रोत्साहनपर )

प्रथम क्रमांक – नवीन समर्थ विद्यालय व ज्युनियर कॉलेज कु. बाम्हंडे वेदांत
विजय

प्रथम क्रमांक-श्री एकविरा विद्या मंदिर व ज्युनियर कॉलेज कुमारी तुपे दिक्षा आबाजी

प्रथम क्रमांक-श्री छत्रपती शिवाजी विद्या मंदिर व ज्युनियर कॉलेज कु. शेटे आदित्य विवेक

प्रथम क्रमांक – प्रगती विद्या मंदिर कुमारी भुजबळ वैष्णवी अजय

 

Vadgaon Maval : खरेदी विक्री संघाची निवडणूक महायुती एकत्रित लढणार
या परीक्षेतील सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना कै. ॲड्. कु.शलाका संतोष खांडगे चॅरिटेबल ट्रस्ट मार्फत शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे.
प्रथम क्रमांक -रु.5001/-, सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्रक
द्वितीय क्रमांक -रु.3001/-, सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्रक
तृतीय क्रमांक – रु. 2001/-,
सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्रक
(अ) उत्तेजनार्थ शिष्यवृत्ती-रु1001/, सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्रक

(ब)उत्तेजनार्थ शिष्यवृत्ती- रु.1001/- सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्रक

तसेच प्रत्येक शाळेत प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यास प्रोत्साहनपर रु. 501 /- व प्रशस्तीपत्रक दिले जाणार
आहे. समर्थ शलाका शिष्यवृत्ती परीक्षा यशस्वी करण्यासाठी परीक्षा समन्वयक उमेश इंगुळकर,वासंती काळोखे,पांडुरंग पोटे,कैलास पारधी, भाऊसाहेब आगळमे,सविता चव्हाण, संजय वंजारे व सर्व शाळेतील शिक्षक वृंद व शिक्षकेत्तर कर्मचारी वर्ग तसेच संस्था कर्मचारी वर्ग यांनी विशेष परिश्रम घेतले.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.