Pune News : चतु:शृंगी, डेक्कन आणि कोथरूड पोलीस ठाण्यात नवीन अधिकाऱ्यांची नियुक्ती
एमपीसी न्यूज : पुणे शहर पोलीस आयुक्तालयातील चतु:शृंगी, डेक्कन आणि कोथरूड पोलीस ठाण्यात नवीन पोलीस अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.(Pune News) रविवारी पोलीस आयुक्तालयात अंतर्गत बदल्या करण्यात आल्या आहेत.
मागील काही दिवसांपासून रिक्त असलेल्या चुतुःश्रृंगी पोलीस ठाण्याचा पदभार आता खंडणी विरोधी पथक दोनचे पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे यांना देण्यात आली आहे. तर, गुन्हे शाखेच्या युनिट पाचचे पोलिस निरीक्षक हेमंत पाटील यांची कोथरूड पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षक पदी नियुक्ती करण्यात आली आहे.
Pune News : वॉचमन तरुणीवर बलात्कार करून गर्भपात करण्यास भाग पाडले, गुन्हा दाखल
विशेष शाखेतून संदीपान पवार यांना डेक्कन पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षक पदाची जबाबदारी देण्यात आली आहे.( Pune News) तर कोथरूड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक महेंद्र जगताप यांची विशेष शाखा तर कोथरूड पोलिस ठाण्याचे गुन्हे निरीक्षक बाळासाहेब बडे यांची वाहतूक शाखेत बदली करण्यात आली आहे.