Pimpri : कारची दुचाकीला मागून धडक; दुचाकीस्वार जखमी
एमपीसी न्यूज : कारने दुचाकीस (Pimpri) मागून धडक दिल्याने दुचाकीस्वार जखमी झाल्याची घटना पिंपरी येथे घडली. याबाबत विनोद भारती (वय साठ वर्षे, रा. एम्पायर स्क्वेअर, चिंचवड) यांनी पिंपरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. इनोव्हा चारचाकी गाडीवरील अज्ञात चालकाविरोधात भा.द.वि कलम 279, 337, 338 मोटर वेहिकल कायदा कलम 132 (अ)(1), 179, 119/177, 184 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी हे त्यांच्या मोटरसायकलवरून 27 डिसेंबर 2022 रोजी दुपारी 1 वाजता शंकर नगर, एक्साईड बॅटरी कंपनी समोरील सार्वजनिक रस्त्यावरून घरी जात असताना त्यांच्या गाडीच्या पाठीमागून येणाऱ्या चारचाकी इनोव्हा गाडीने फिर्यादी त्यांच्या दुचाकीस धडक दिली.
Chakan Accident : सिग्नलला थांबलेल्या कारला टेम्पोने दिली धडक; आरोपी अटकेत
या अपघातात फिर्यादी यांच्या डोक्याला मार लागून ते जखमी झाले आहेत. या अज्ञात कार चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.