Chakan Accident : सिग्नलला थांबलेल्या कारला टेम्पोने दिली धडक; आरोपी अटकेत

एमपीसी न्यूज : सिग्नलला थांबलेल्या (Chakan Accident) कारला टेम्पोने धडक दिल्याची घटना चाकण येथे घडली. कारचे नुकसान केल्याप्रकरणी एकाला अटक करण्यात आले आहे.

याबाबत संदीप अंबोरे (वय 28 वर्षे, रा. मांगवाडी, मूळ नाशिक) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. दुर्गा चव्हाण (वय 50 वर्षे, रा. पालघर, मूळ रा. उत्तर प्रदेश) या आरोपीला अटक करण्यात आली आहे. त्याच्या विरोधात भादवि कलम 279, 427, मोटर वेहिकल कायदा कलम 184, 119/ 177 अन्वये चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Dehuroad : देवदर्शनासाठी बाहेरगावी गेले असता घरात 4.25 लाख रुपयांची चोरी

27 डिसेंबर रोजी रात्री 8 वाजता फिर्यादी हे त्यांची सुझुकी एर्टिगा हि कार पुणे येथून पॅसेंजर भरून नाशिककडे जात असताना आळंदी फाट्याच्या पुढे चाकण येथील बालाजीनगर सिग्नलला (Chakan Accident) थांबवली होती. त्यावेळेस पाठीमागून आयशर टेम्पोने जोरदार धडदिली. यावेळी कार पुढे जाऊन पुढील टाटा 909 या गाडीस पाठीमागून धडकली. आणि फिर्यादीच्या गाडीचे बंपर बोनेट हेडलाईट तुटले तर पाठीमागील बाजूची डिकी चेंबून सुमारे 60,000 रुपयांचे नुकसान झाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.