Dehuroad : देवदर्शनासाठी बाहेरगावी गेले असता घरात 4.25 लाख रुपयांची चोरी

एमपीसी न्यूज : देवदर्शनासाठी (Dehuroad) बाहेरगावी गेल्याने घरातून 4.25 लाख रुपये रोख रक्कम चोरीला गेल्याची घटना देहूरोड या ठिकाणी घडली आहे.

याबाबत ज्ञानेश्वर पवार (वय 65 वर्षे, रा. देहू रोड) यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी अज्ञात चोरट्याविरोधात भा.द.वि कलम 380, 454, 457 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Chakan News : घरातून सोन्याचे दागिने चोरून नेत असताना एकाला अटक

फिर्यादी हे परिवारासह तुळजापूर, अक्कलकोट (Dehuroad) असे देवदर्शन करण्यासाठी गेले असताना चोरट्याने घराचा टाळा तोडून  घरातील 4.25 लाख रुपये रोख रक्कम चोरी करून नेली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.