Dighi : कचराकुंडी साफ केली नाही म्हणून तरुणाला मारहाण
एमपीसी न्यूज – कचराकुंडी साफ केली नाही म्हणून एका 19 वर्षीय पेंटरला चौघांनी मारहाण केली आहे. हि घटना रविवारी( दि.26 ) दिघीमध्ये (Dighi) आळंदी रोड येथे घडली.
याप्रकणी अमित सुधाकर दिक्षित (वय 19, रा.दिघी मूळ उत्तरप्रदेश) यांनी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरून निलेश ओव्हाळ व त्याच्या 3 साथीदारांवर गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे काम करत असताना आरोपीने त्यांना कचराकुंडी साफ करण्यास सांगितली. यावेळी फिर्यादी यांनी त्याला नकार दिला. यावेळी आरोपीने त्याच्या साथीदारांना बोलावून फिर्यादीला लाथाबुक्क्या व लाकडी दांडक्याने मारहाण केली.
तसेच निलेश याने फिर्यादीच्या खिशातून 1 हजार 400 रुपये काढून (Dighi) घेतले. यावरून दिघी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.
Maval : चुलत्याच्या घरी झोपायला जाणे पडले महागात, घरी झाली 1 लखाची घरफोडी