Nigdi : चप्पल बाहेर काढण्यास सांगितल्याने तोडफोड करणाऱ्यांना अटक
एमपीसी न्यूज – चिखलाने भरलेली चप्पल दुकानाबाहेर काढण्यास सांगितल्याच्या कारणावरून सहा जणांच्या टोळक्याने दुकानातील कर्मचाऱ्यावर कोयत्याने वार केले. दुकान तसेच रस्त्यावरील वाहनांची तोडफोड केली. ही घटना शनिवारी (दि. 8) रात्री साडेनऊ वाजताच्या सुमारास रुपीनगर, तळवडे येथे घडली.
Vadgaon Maval: रामदास काकडे यांच्या प्रवेशाने मावळात कॉंग्रेसला मिळणार नवसंजीवनी
राजेंद्रसिंह हरिसिंह राठोड (वय 37, रा. बल्हाळेश्वर हाउसिंग सोसयटी, रुपीनगर, तळवडे) यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अवघ्या 12 तासांत सहा आरोपींना अटक केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री साडेनऊ वाजताच्या सुमारास पाच आरोपी फिर्यादी राठोड यांच्या मातोत्री गारमेंटस् या दुकानात खरेदीसाठी आले. त्यांची चप्पल चिखलाने भरलेली असल्याने कामगाराने त्यांना चप्पल बाहेर काढण्यास सांगितले.
त्यावेळी त्याच्यात वाद झाला. फिर्यादी यांनी तो वाद मिटवला. थोडावेळ मुलांनी कपडे खरेदीचा बहाणा केला. त्यानंतर दोन मुले दुकानाबाहेर गेली आणि त्यांनी आरडा-ओरडा करीत दुकानाच्या काचेवर दगड मारले. त्यापैकी एक दगड फिर्यादी यांच्या डोक्यास घासून गेल्याने किरकोळ जखम झाली.
त्यानंतर एका मुलाने कमरेला लपविलेला कोयता काढून कामगार भरतसिंग याच्या डोक्यावर मारला. मात्र तो कोयता त्याने हाताने अडविल्याने हाताला जखम झाली. त्यानंतर दुकानातील साहित्य अस्ताव्यस्त फेकले.
आरडा-ओरडा करीत बाहेर जाऊन “आम्ही इथले भाई आहोत. आमच्या नादाला कोणी लागत नाही. असे म्हणत रस्त्यावर पार्क केलेली दोन दुचाकी व चारचाकी अशी पाच वाहनांची आरोपींनी तोडफोड केली. निगडी (Nigdi ) पोलीस तपास करीत आहेत.