Nigdi : चालकाचे नियंत्रण सुटल्याने मिक्सर ट्रकची चार वाहनांना धडक

एमपीसी न्यूज – मिक्सर ट्रक वरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रकची चार वाहनांना धडक बसली यामध्ये वाहनांचे नुकसान झाले. ही घटना शनिवारी (दि. 8) रात्री निगडी (Nigdi) गावठाण येथील लक्ष्मीनगर परिसरात घडली.

Moshi : शॉर्टसर्किटमुळे मेडिकल दुकानाला आग

मिळालेल्या माहितीनुसार, एमएच 14/सीपी 3936 हा मिक्‍सर ट्रक लक्ष्मीनगर परिसरातून जात होता. चालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटल्याने ट्रकने चार दुचाकी वाहनांना धडक दिली.

 

लक्ष्मीनगर परिसरात नेहमी लहान मुले खेळत असतात. मात्र मिक्सरने वाहनांना धडक दिल्याची घटना घडली त्यावेळी सुदैवाने त्या ठिकाणी कोणी नव्हते. त्यामुळे जिवितहानी झाली नाही. मात्र दुचाकींचे नुकसान झाले आहे. लक्ष्मीनगर परिसरात अवजड वाहनांना बंदी घालावी, अशी मागणी स्थानिकांकडून होत आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.