Pimpri : बाजीराव पेशवे यांच्या जयंती सप्ताहनिमित्त समस्त ब्राह्मण समाजातर्फे दुचाकी रॅली
एमपीसी न्यूज – श्रीमंत बाजीराव पेशवे यांच्या जयंती सप्ताहनिमित्त पिंपरी चिंचवड (Pimpri ) शहरात सोमवारी (दि.21) समस्त ब्राह्मण समाजातर्फे दुचाकी रॅलीचे आयोजन करण्यात आले. या रॅलीमध्ये पेशवे घराण्याचे दहावे वंशज पुष्कर पेशवे हे उपस्थित होते. रॅलीची सुरुवात एच ए कॉलनी पिंपरी येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करून करण्यात आली .तर नेहरू नगर येथील रंजनास सभागृह या मार्गापर्यंत दुचाकी रॅलीचा समारोप करण्यात आला .
PCMC : शहरातील 34 हजार फेरीवाल्यांना ‘पीएम स्वनिधी’
यावेळी रॅलीत संदीप जाधव, विशाल मासुळकर, विलास मडेगिरी , निवास कुलकर्णी , सचिन बोधनी, राजन लोणकर, नरेंद्र चिपळूणकर , दीपा रंगण,स्मिता देशपांडे, प्रियांका नंद,कविता शर्मा , अश्विनी कुलकर्णी , अंकित काणे , मुकुंद घोलप, अनिल शर्मा, सुभाष शर्मा, धनंजय बुडूख ,भावेन पाठक ,परीक्षित वाघेरे व संजय मंगोडकर तसेच विविध संस्थेच्या सदस्यांनी देखील उपस्थिती लावली होती.
याप्रसंगी पिंपरी संत तुकाराम नगर येथील संत तुकाराम महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून संस्थेच्या सदस्यांनी अभिवादन केले व शिववंदना आणि मंत्रपुष्पांजली ने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली . रॅलीत सहभाग घेतलेल्या सदस्यांनी भगवे झेंडे आणि छत्रपती शिवाजी महाराज व बाजीराव पेशवे यांच्या घोषणा (Pimpri ) दिल्या.