Metro News : शाहरुख खानच्या ‘जवान’ चित्रपटाचे चित्रीकरण झाले चक्क पिंपरी चिंचवड मेट्रोमध्ये!
एमपीसी न्यूज : शाहरुख खान, नयनतारा आणि विजय सेतुपती (Metro News ) यांची मुख्य भूमिका असणारा ‘जवान’ चित्रपट नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. पहिल्याच दिवशी भारतातील सर्व भाषांमध्ये या चित्रपटाने 75 कोटींचा व्यवसाय केला आहे. या चित्रपटातील शाहरुख खानचा मेट्रोमधील एका सीनची चर्चा होत असून हा याचे चित्रीकरण चक्क पिंपरी चिंचवड मेट्रोमध्ये करण्यात आले आहे.
#PuneMetroShinesinBollywood : '#Jawan' Filmed at Sant Tukaram Nagar Station 📷 A Proud Moment for Pune and Pimpri-Chinchwad citizens and Pune Metro!"#bollywoodmovies #jawansrk #JawanFirstDayFirstShow #shooting #punemetro pic.twitter.com/bu0pZZLdhh
— Pune Metro Rail (@metrorailpune) September 8, 2023
पुण्यातील संत तुकाराम नगर स्थानकावर हा सीन चित्रित करण्यात आला आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवड नागरिकांसाठी आणि (Pune Metro) पिंपरी चिंचवड आणि पुणे मेट्रोसाठी हा अभिमानास्पद क्षण असल्याचे ट्विट पुणे मेट्रोच्या अधिकृत ट्विटरवर करण्यात आले आहे.
शाहरुख खानच्या आगामी चित्रपटाच्या जाहिरातित #पुणेमेट्रो च्या संत तुकाराम नगर स्थानकाची ची झलक.
Excited to share with you glimpse of Pune Metro's Sant Tukaram Nagar #MetroStation in the teaser of Shah Rukh Khan's upcoming movie
The first film which was shot at #PuneMetro@iamsrk pic.twitter.com/1SNhHOL0A3— Pune Metro Rail (@metrorailpune) June 8, 2022
गुरुवार 7 सप्टेंबर 2023 रोजी ‘जवान’ चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटातील चित्रीकरणासाठी पिंपरी चिंचवड मेट्रोची निवड (Metro News ) होणे हे अभिमानास्पद असल्याचेही पुणे मेट्रोने म्हंटले आहे.