Pimpri : एक मराठा लाख मराठा, कोण म्हणतेय देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही; मोर्चा पिंपरीत दाखल

एमपीसी न्यूज – ‘एक मराठा लाख मराठा’, ‘आरक्षण आमच्या हक्काचे नाही, कोणाच्या बापाचे’, ‘तुमचे आमचे नाते (Pimpri) काय, जय जिजाऊ, जय शिवराय’, “कोण म्हणतेय देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही, या सरकारचे करायचे काय, खाली डोके वर पाय, सरकार हमसे डरती है, पोलीस को आगे करती है अशा जोरदार घोषणा देत मोर्चा पिंपरीत धडकला.

जालन्यातील मराठा समाजाच्या आंदोलनावर झालेल्या लाठीमाराच्या निषेधार्थ आज शनिवारी पिंपरी-चिंचवड बंद आहे. बंदला शहरातून मोठा प्रतिसाद मिळत आहे. पिंपरीगावातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून डीलक्स चौक मार्गे मेन बाजार पिंपरी या मार्गाने महामोर्चा डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक पिंपरी येथे दाखल झाला आहे.

मराठा क्रांती मोर्चाचे सर्व समन्वयक दिवसभर पिंपरीत उपोषण करणार आहेत. आंदोलनावर हल्ल्याच्या निषेधार्थ निषेध सभा होवून महामोर्चाचे सांगता होणार आहे.

Maval : शिवणे येथील श्री संत तुकाराम विद्यालयात विज्ञान व संगणक कक्षाचे उद्घाटन

या मोर्चात राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे, काँग्रेसचे शहराध्यक्ष कैलास कदम, शिवसेनेचे शहरप्रमुख सचिन (Pimpri) भोसले, जिल्हाप्रमुख गौतम चाबुकस्वार, जिल्हा संघटिका सुलभा उबाळे, मनसेचे शहराध्यक्ष सचिन चिखले, मोर्चाचे कार्यकर्ते मारुती भापकर,माजी नगरसेवक नाना काटे, संदीप वाघेरे, सीमा सावळे, तुषार कामठे, विनायक रणसुभे, सुनील गव्हाणे, वर्षा जगताप, काशिनाथ नखाते आदी सहभागी झाले होते.

या मोर्चात महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. त्याचबरोबर मुस्लिम समाजातील महिला देखील सहभागी झाल्या होत्या. शांततेत मोर्चा पिंपरीत दाखल झाला. मोर्चासोबत पोलिसांचाही मोठा फौजफाटा होता. आंदोलनस्थळी पिंपरी चौकात पोलीस मोठ्या संख्येने तैनात आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.