Pimpri : ॲडव्होकेटस् बार असोसिएशनतर्फे आमदार महेश लांडगे यांचा सन्मान

एमपीसी न्यूज – पिंपरी चिंचवड न्यायालय इमारतीच्या उभारणीचा प्रश्न (Pimpri) मार्गी लावल्याबद्दल पिंपरी-चिंचवड ॲडव्होकेटस् बार असोसिएशनच्या वतीने आमदार महेश लांडगे यांचा सन्मान करण्यात आला.

बार असोसिएशनच्या उपाध्यक्ष ॲड. जयश्री कुटे, माजी अध्यक्ष ॲड. सतिश गोरडे, माजी अध्यक्ष ॲड. विलास कुटे,(Pimpri) सचिव ॲड. गणेश शिंदे, सहसचिव ॲड. मंगेश नढे, ॲड. राजेश रणपिसे, ॲड. विश्वेश्वर काळजे, ॲड. आशिष गोरडे आदी मान्यवरांची उपस्थिती होती.

पिंपरी – चिंचवड न्यायालयाची (Pimpri)अद्ययावत इमारत उभारावी, असा निर्धार ‘व्हीजन – 2020’ मध्ये करण्यात आला होता. मोशी येथे यासाठी चार मजली इमारतीचे प्रशस्त बांधकाम होणार असून नोव्हेंबर 2023 मध्ये त्याचा भूमिपूजन समारंभ संपन्न होणार आहे. त्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग, पुणे प्रशासनाने राष्ट्रीय स्तरावरील निविदा प्रक्रिया प्रसिद्ध केली आहे.

त्यामुळे पिंपरी – चिंचवडकरांची हक्काची न्यायालय इमारत दृष्टिक्षेपात आली आहे. नियोजित न्यायालयात अत्याधुनिक सुसज्ज ग्रंथालय, पक्षकारांसाठी उत्तम आणि सुसज्ज आसनव्यवस्था, प्रशस्त असे पुरुष आणि महिला बार रूम, प्रशस्त वाहनतळ, प्रशस्त न्यायालय दालन अशा विविध सुविधा असणार आहेत.

Pimpri News : अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप यांच्या निवडीवर शासनाकडून शिक्कामोर्तब

सत्काराला उत्तर देताना महेश लांडगे यांनी, “पिंपरी – चिंचवडकर नागरिकांच्या(Pimpri) वतीने या सत्काराचा मी स्वीकार करतो. राज्य सरकार, महापालिका प्रशासन यांच्याकडून नव्या इमारतीच्या उभारणी संदर्भात सर्वतोपरी सहकार्य करण्याची मी ग्वाही देतो!” असे आश्वासन दिले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.