Wakad : ‘200 दिवसात मिळणार 200 टक्के रिटर्न’ या स्कीमने घातला दहा लाखांचा गंडा

एमपीसी न्यूज – गुंतवणूक केलेल्या (Wakad) रकमेवर 200 दिवस दररोज एक टक्का रक्कम मिळणार असल्याचे आमिष दाखवून एका महिलेची 10 लाख 86 हजारांची फसवणूक केली. हा प्रकार 17 जुलै 2022 ते 21 सप्टेंबर 2023 या कालावधीत रहाटणी येथे घडला.

शंकर सिदाप्पा मेगाप्पागोल (रा. यादगुड, ता. हुक्केरी, जि. बेळगाव, कर्नाटक) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पिडीत महिलेने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

PCMC : कर संकलन विभागाचा उद्या कर संवाद; युपिक आयडी, सर्वेक्षणाची मालमत्ता धारकांना मिळणार सविस्तर माहिती

पोलिसांनी दिलेल्या (Wakad) माहितीनुसार, झोन 10 मल्टी ट्रेड या कंपनीचा मालक आरोपी शंकर याने फिर्यादीला गुंतवणुकीची एक स्कीम सांगितली. गुंतवणूक केलेल्या रकमेवर दररोज एक टक्का परतावा मिळेल. हा परतावा 200 दिवस मिळत राहील. त्यामुळे 200 दिवसात 200 टक्के परतावा मिळेल, अशी स्कीम सांगून फिर्यादीचा विश्वास संपादन केला.

त्यानुसार फिर्यादीने आरोपीच्या कंपनीत 22 लाख 40 हजार रुपये गुंतवणूक केली. त्यानंतर आरोपीने फिर्यादीस 11 लाख 53 हजार 880 रुपये परत केले. उर्वरित 10 लाख 86 हजार 120 रुपये परत केले नाहीत. ते पैसे देण्यासाठी आरोपीने टाळाटाळ केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.