Paytm : पेटीएम पेमेंट बँकेवर आरबीआयची मोठी कारवाई
एमपीसी न्यूज – पेटीएम पेमेंट बँक लिमिटेड (PPBL) या पेटीएमच्या (Paytm)उप कंपनीवर रिझर्व बँक ऑफ इंडिया (आरबीआय)ने मोठी कारवाई केली आहे. पेटीएम पेमेंट बँक आता नवीन ग्राहक जोडू शकणार नाही.
तसेच 29 फेब्रुवारी पासून बँकिंग सेवा देण्यावर देखील बंदी घालण्यात आली आहे. आरबीआयने (RBI ) बुधवारी (दि. 31) जानेवारी याबाबत आदेश दिले आहेत.
आरबीआयने केलेल्या कारवाईनुसार, पेटीएम पेमेंट बँक 29 फेब्रुवारी (Paytm)पासून बँकिंग सेवा देऊ शकणार नाही. आरबीआयच्या नियमांचे पालन न केल्याचा ठपका ठेवत ही कारवाई करण्यात आली आहे.
पेटीएम पेमेंट बँकेचे खातेधारक असलेल्या नागरिकांना खात्यामध्ये शिल्लक असलेल्या रकमेचा वापर करता येणार आहे. बँकेच्या सेविंग अकाउंट, करंट अकाउंट, प्रीपेड इन्स्ट्रुमेंट, फास्टटॅग, नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड अशा विविध ठिकाणी असलेली रक्कम खातेधारकांना वापरता येणार आहे.
एटीएम पेमेंट बँकेचे ऑडिट केल्यानंतर त्या अहवालामध्ये अनेक तथ्ये समोर आली आहेत. त्यामध्ये पेटीएम पेमेंट बँकेने आरबीआयच्या विविध गाईडलाईनचे (RBI GUIDELINES) उल्लंघन केल्याचे आरबीआयने म्हटले आहे. आरबीआयच्या कारवाईमुळे पेटीएम पेमेंट बँकेचे खातेधारक खात्यामध्ये पैसे जमा करू शकणार नाहीत. मात्र खात्यामध्ये शिल्लक असलेले पैसे काढू शकणार आहेत.