मावळात काँग्रेसचा शिवसेनेच्या चार उमेदवारांना अधिकृत जाहीर पाठिंबा
एमपीसी न्यूज – मावळ तालुक्यात काँग्रेस आय पक्षाने अधिकृत पत्रक काढत
एमपीसी न्यूज – मावळ तालुक्यात काँग्रेस आय पक्षाने अधिकृत पत्रक काढत शिवसेनेच्या कुसगाव जिल्हा परिषद गटाच्या उमेदवार सत्यभामा शांताराम गाडे, कुसगाव पंचायत समितीच्या उमेदवार उषा संजय घोंगे, वाकसई पंचायत समितीचे सदस्य बाबू शेळके, चांदखेड पंचायत समितीच्या उमेदवार मनिषा आनंदा मालेकर (केदारी) यांना जाहीर पाठिंबा दिला असल्याचे काँग्रेस आयचे मावळ तालुका कार्याध्यक्ष यशवंत मोहोळ यांनी सांगितले.
पुणे जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत सातकर, संभाजी राक्षे व भरत दळवी यांच्या सदर पाठिंबा पत्रकावर स्वाक्षर्या आहेत. काँग्रेस पक्षाची कुसगाव जिल्हा परिषद गटात व चांदखेड पंचायत समिती गणात चांगली ताकद आहे. ही ताकद शिवसेनेच्या मागे पुर्ण क्षमतेने उभी करून शिवसेना उमेदवार निवडून देण्याबाबत काँग्रेस कार्यकर्त्यांना आवाहन करण्यात आले आहे. या बदल्यात काही जागांवर शिवसेना काँग्रेसच्या उमेदवारांना मदत करणार असल्याचा अंतर्गत समझोता झाला आहे.