Pune Railway : पुणे ते मुझफ्फरपूरसाठी दहा उन्हाळी विशेष गाड्या

एमपीसी न्यूज – रेल्वे विभागाने बहुतांश मार्गांवर उन्हाळी विशेष गाड्या ( Pune Railway) सोडल्या आहेत. उन्हाळ्याच्या सुट्ट्यांसाठी गावी जायला होणारी प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी रेल्वेने उन्हाळी विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. पुणे ते मुझफ्फरपुर दरम्यान दहा विशेष रेल्वे सोडल्या जाणार आहेत.

गाडी क्रमांक 05290 पुणे- मुझफ्फरपूर सुपरफास्ट एसी विशेष 29 एप्रिल ते 1 जुलै दरम्यान (10 ट्रीप) दर सोमवारी पुण्याहून सकाळी 6.30 वाजता सुटेल आणि मुझफ्फरपूरला दुसऱ्या दिवशी दुपारी 3.15 वाजता पोहोचेल.

Pune : केशव व्यंकटेश चाफेकर क्रिडागृहात आग; अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण

गाडी क्रमांक 05289 मुझफ्फरपूर – पुणे सुपरफास्ट एसी विशेष 27 एप्रिल ते 29 जून दरम्यान (10 ट्रीप) दर शनिवारी मुझफ्फरपूर येथून रात्री 9.15 वाजता सुटेल आणि तिसऱ्या दिवशी पहाटे 5.35 वाजता पुण्याला पोहोचेल.

ही गाडी हडपसर, दौंड कॉर्ड लाइन, अहमदनगर, बेलापूर, कोपरगाव, मनमाड, भुसावळ, खंडवा, इटारसी, जबलपूर, कटनी, सतना, प्रयागराज छिवकी, पंडित दीनदयाळ उपाध्याय जंक्शन, बक्सर, आरा, दानापूर, पाटलीपुत्र आणि हाजीपूर येथे थांबेल. या गाडीचे बुकिंग 25 एप्रिल पासून सुरु होणार ( Pune Railway) आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.