Bhosari : किरकोळ कारणावरून तरुणाला मारहाण
एमपीसी न्यूज – किरकोळ कारणावरून दोघांनी मिळून एका तरुणाला बेदम मारहाण केली. यामध्ये तरुण जखमी झाला. ही घटना मंगळवारी (दि. 18) सकाळी अकराच्या सुमारास महात्मा फुले नगर येथे घडली.
गौतम अशोक राक्षे (वय 23, रा. महात्मा फुले नगर, ननावरे ऑफिस समोर, पुणे) यांनी याप्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार मनोज शहा (वय 24), कमल शहा (वय 45) या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी गौतम मंगळवारी सकाळी अकराच्या सुमारास महात्मा फुले नगर येथे थांबले असता आरोपींनी किरकोळ कारणावरून लाथाबुक्क्यांनी व लाकडी दांडक्याने मारहाण केली. यामध्ये गौतम जखमी झाले. यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी कमल आरोपी मनोज याची आई आहे. आरोपींना अद्याप अटक करण्यात आलेली नाही. पोलीस उपनिरीक्षक गिरनार तपास करीत आहेत.