Wakad : फोनवरून अश्लील शिवीगाळ करत महिलेचा विनयभंग
एमपीसी न्यूज – वेगवेगळ्या मोबाईल नंबरवरून फोन करून महिलेला अश्लील शिवीगाळ करत तिचा विनयभंग केला. ही घटना 21 डिसेंबर ते 26 जानेवारी या कालावधीत रहाटणी फाटा येथे घडली.
याप्रकरणी 30 वर्षीय महिलेने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार सोपान सहाणे (पूर्ण नाव पत्ता माहिती नाही) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने फिर्यादी महिलेला तीन वेगवेगळ्या मोबाईल क्रमांकावरून महिलेला फोन केले. त्याने महिलेला अश्लील शिवीगाळ करत शारीरिक संबंध ठेवण्याची धमकी दिली. याबाबत महिलेच्या पती आणि मावस दीर यांना समजले असता आरोपीने त्यांना देखील शिवीगाळ करून दमदाटी केली. याबाबत महिलेने वाकड पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा नोंदवला. सहाय्यक पोलीस निरीक्षक माने तपास करीत आहेत.