Pimpri: सुरेखा भोंगळे यांचे निधन
एमपीसी न्यूज – निवृत्त मृदसंधारण अधिकारी कै.मुरलीधर लक्ष्मण भोंगळे यांच्या पत्नी श्रीमती सुरेखा मुरलीधर भोंगळे (रा.सासवड,जि.पुणे) यांचे मंगळवारी (दि. २६ मार्च) वृद्धापकाळाने निधन झाले.
त्यांच्या मागे मुलगा किशोर मुरलीधर भोंगळे (डेप्युटी इंजिनियर, M.I.D.C) आणि कन्या शोभा कोकाटे, प्रभावती रायकर, प्रा.अनुजा गडगे, हेमांगी जाधव आणि पिंपरी चिंचवडमधील साहित्यिक, कवयित्री माधुरी विधाटे असा परिवार आहे. त्यांचा स्वभाव मनमिळाऊ होता. तसेच सामाजिक तसेच धार्मिक कार्यात त्यांचा सहभाग असायचा.