Chikhali : चिखली पोलीस ठाण्यात मोबाईल व गंठण चोरीचे गुन्हे दाखल

एमपीसी न्यूज – पायी चालत जाणाऱ्या एका इसमाचा मोबाईल तर महिलेचे गंठण चोरून नेले आहे. या दोन्ही चोरी प्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल (Chikhali)  केले आहेत.

पहिल्या घटनेत प्रविण सुभाष लांजेवार (वय 42, रा.चिखली) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी पायी जात असताना अज्ञात दुचाकी चालक आला व त्याने फिर्यादीच्या हातातील 10 हजार रुपयांचा मोबाईल चोरून नेला आहे. हा प्रकार चिखली प्राधिकरण येथे बुधवारी (दि.5) रात्री पावणे दहा वाजता घडला. चिखली पोलिसांनी तक्रार दाखल केली आहे.

Dapodi : दापोडी येथे भरदिवसा दुकानात घुसून दुकानदारावर कोयत्याने वार

दुसऱ्या घटनेत महिलेने फिर्याद दिली असून, त्या त्यांच्या मुलीसोबत पायी घरी जात असताना (Chikhali) अज्ञात दुचाकीस्वार पाठीमागून आला व त्याने फिर्यादीच्या गळ्यातील दोन तोळे वजनाचे 50 हजार रुपयांचे सोन्याचे मिनी गंठण हिसकावून नेले. यावरून चिखली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पोलीस पुढिल तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.