Pune : पोलीस लाईन मधील संतप्त महिलांचा पालकमंत्र्यांच्या घरावर मोर्चा 

एमपीसी न्यूज – शिवाजी नगर पोलीस वसाहतीत गेल्या 4 – 5 दिवसांपासून पाण्याची भीषण टंचाई जाणवत आहे. त्यामुळे येथील नागरिक पुरते मेटाकुटीला आले आहेत. आज ( रविवार ) संतप्त झालेल्या पोलिसांच्या नातेवाईकांनी थेट हंडा घेऊन पालकमंत्री गिरीश बापट यांच्या घरावरच मोर्चा काढला. तर दुसरीकडे पोलीस वसाहतीत रस्ता रोको देखील केला. दरम्यान, पालकमंत्री गिरीश बापट यांनी आज सायंकाळपर्यंत टँकरने पाणी पुरवठा करण्याचे आश्वासन दिले आहे. 

खडकवासला कालवा फुटीनंतर शहराच्या अनेक  भागात पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. त्यामुळे शहरातील हजारो नागरिक त्रस्त झाले आहेत. शहरातील पूर्व भागातील पाणी पुरवठा तर यापूर्वीपासूनच विस्कळीत आहे. शिवाजीनगर पोलीस लाईनमध्ये अगोदरपासून अपुरा पाणीपुरवठा होत होता. त्यात गेल्या तीन दिवसांपासून जलसंपदा विभागाने पालिकेचे पंप बंद केल्याने एसएनडीटी
टाकीतून अपुरा पाणीपुरवठा होत असल्याने जंगली महाराज रोड, शिवाजीनगर गावठाण, जनवाडी, गोखलेनगर, मॉडेल कॉलनी या परिसरात अत्यंत कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.