Pimpri : शहरातील गुरुवारचा पाणीपुरवठा बंद, शुक्रवारचा विस्कळीत

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेकडील (Pimpri)पाणीपुरवठा विभागाच्या अशुध्द जलउपसा केंद्र, रावेत आणि पाणीपुरवठा वितरण व्यवस्थेअंतर्गत यंत्रणेची आवश्यक देखभाल दुरुस्तीची कामे करण्यात येणार आहेत.

 

त्यामुळे शहरातील गुरुवारी सायंकाळचा पाणीपुरवठा बंद तर शुक्रवारचा विस्कळीत राहणार आहे.

Pimpri : लघुउद्योग संघटनेच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन

रावेत नदी जलउपसा केंद्र येथील गुरुवार 18 जानेवारी 2024 रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत रावेत येथील जलउपसा केंद्र बंद राहणार असल्याने पिंपरी-चिंचवड शहराचा 18 जानेवारी  रोजी सायंकाळी होणारा पाणीपुरवठा बंद राहणार आहे.

 

तसेच शुक्रवार दिनांक 19 जानेवारी  रोजी होणारा (Pimpri )सकाळचा पाणीपुरवठा अनियमीत व कमी दाबाने होईल.

तरी नागरिकांनी मनपाकडील उपलब्ध पाण्याचा पुरेसा साठा करुन काटकसरीने पाणी वापर करून महानगरपालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन पाणीपुरवठा विभागाने केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.