Pimpri : लघुउद्योग संघटनेच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड लघुउद्योग संघटनेच्या (Pimpri) सन 2024 या नवीन वर्षाच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन भोसरी विधानसभेचे आमदार महेश लांडगे यांच्या हस्ते करण्यात आले.

या प्रसंगी पिंपरी चिंचवड लघुउद्योग संघटनेचे अध्यक्ष -संदीप बेलसरे, सचिव जयंत कड, खजिनदार संजय ववले, प्रसिद्धी प्रमुख विजय खळदकर, माजी अध्यक्ष सुरेश म्हेत्रे, संचालक संजय सातव, नवनाथ वायाळ, प्रमोद राणे, भारत नरवडे, सचिन आदक स्विकृत संचालक – संजय भोसले, सुरेश गवस, योगेश लोंढे तसेच संघटनेचे सभासद उपस्थित होते.

Mahavitaran : ‘महापॉवर-पे’द्वारे तब्बल 218 कोटींचा वीजबिल भरणा

या दिनदर्शिकेत लघुउद्योजकांना आवश्यक असणारी माहिती तसेच सर्वसामान्य व्यक्तींना लागणारी तिथी स्वरूपातील माहिती ही मराठीमध्ये ठळकपणे नमूद करण्यात आलेली आहे. या दिनदर्शिकेचे पिंपरी-चिंचवड औद्योगिक परिसरातील (Pimpri) जवळपास सर्वच लघुउद्योजकापर्यत वितरण करण्यात येते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.