Maval : मावळ तालुक्यातील मांस व मद्य विक्री 22 जानेवारी रोजी बंद ठेवा ; रवींद्र भेगडे यांची तहसीलदारांकडे मागणी

एमपीसी न्यूज – आयोध्या येथे निर्माणाधीन राम मंदिरात(Maval) प्रभू श्रीराम यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा 22 जानेवारी रोजी होत आहे. या पार्श्वभूमीवर 22 जानेवारी रोजी मावळ तालुक्यातील मांस व मद्य विक्री बंद ठेवावी, अशी मागणी मावळ भाजपा निवडणूक प्रमुख रवींद्र भेगडे यांनी केली आहे.रवींद्र भेगडे यांनी याबाबत तहसीलदार विक्रम देशमुख यांना निवेदन दिले आहे. यावेळी तालुकाध्यक्ष दत्ता गुंड उपस्थित होते.

22 जानेवारी 2024 रोजी आयोध्या येथील प्रभू श्रीराम मंदिराचा लोकार्पण सोहळा साजरा होत असून तब्बल 500 वर्षानंतर प्रभू श्री राम मूर्ती प्राणप्रतिष्ठा होत आहे. यानिमित्ताने सबंध देशामध्ये आनंदाचे उत्साहाचे वातावरण आहे.

Pune : ‘पीएमपीएमएल’च्या 1900 बदली कर्मचाऱ्यांना कायम सेवेत रुजू करणार ; शिवसेना शहरप्रमुख प्रमोद नाना भानगिरे यांच्या आंदोलनाला मोठे यश

प्रभू श्री राम हे हिंदू धर्माचे श्रध्दास्थान आहेत. (Maval)त्यामुळे या ऐतिहासिक सोहळ्यानिमित्त संपूर्ण देशभरामध्ये दिवाळी साजरी केली जाणार असून मावळ तालुक्यात देखील विविध ठिकाणी मोठ्या प्रमाणात जल्लोष साजरा केला जाणार आहे.

यानिमित्ताने सर्व समाज बांधवांमध्ये शांतता,एकोपा व सामाजिक संदेश जावा यासाठी आपण मावळ तालुक्यातील सर्व मांस विक्री केंद्र बंद ठेऊन समस्त हिंदू बांधवांच्या भावनेचा आदर करावा अशी मागणी आज मावळ भाजपा निवडणूक प्रमुख रविंद्र भेगडे यांनी मावळचे तहसीलदार विक्रम देशमुख साहेब यांच्याकडे केली आहे. यावेळी त्यांच्या समवेत तालुकाध्यक्ष दत्ताभाऊ गुंड उपस्थित होते.!

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.